Tata Harrier EV new variant price India : भारतीय इलेक्ट्रिक वाहन बाजारपेठेत आपली पकड मजबूत करण्यासाठी टाटा मोटर्सने Harrier EV श्रेणीत एक नवीन आणि महत्त्वाचा बदल केला आहे. कंपनीने आता या एसयूव्हीचे अधिक स्वस्त असे ‘ऑल व्हील ड्राइव्ह’ मॉडेल लाँच केले असून, यामुळे शक्तिशाली ड्युअल मोटर सेटअप आता अधिक ग्राहकांच्या आवाक्यात आला आहे. यापूर्वी हे वैशिष्ट्य केवळ सर्वात महागड्या टॉप मॉडेलमध्येच उपलब्ध होते.
किंमत किती आहे?
टाटा मोटर्सने Harrier EV चे नवीन ऑल व्हील ड्राइव्ह व्हेरिएंट 26.49 लाख रुपये (एक्स-शोरूम) या किमतीत बाजारात आणले आहे. हे नवीन मॉडेल फियरलेस प्लस 75 या ट्रिमवर आधारित आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीच्या ऑल व्हील ड्राइव्ह पर्यायाच्या तुलनेत हे नवीन व्हेरिएंट तब्बल 2.5 लाख रुपयांनी स्वस्त आहे.
Harrier EV ची सुधारित किंमत यादी (एक्स-शोरूम):
- Adventure 65: 21.49 लाख रुपये
- Adventure S 65: 21.99 लाख रुपये
- Fearless Plus 65: 23.99 लाख रुपये
- Fearless Plus 75: 24.99 लाख रुपये
- Fearless Plus QWD 75 (नवीन): 26.49 लाख रुपये
- Empowered 75: 27.49 लाख रुपये
- Empowered QWD 75: 28.99 लाख रुपये
काय आहेत नवीन व्हेरिएंटची वैशिष्ट्ये?
या नवीन मॉडेलमध्ये 75 kWh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे, जी ड्युअल मोटरला ऊर्जा पुरवते. हे इंजिन 313 HP ची शक्ती आणि 504 Nm चा टॉर्क निर्माण करते, ज्यामुळे ही आपल्या सेगमेंटमधील सर्वात शक्तिशाली गाड्यांपैकी एक ठरली आहे. कंपनीचा दावा आहे की ही कार एका चार्जमध्ये 622 किलोमीटरपर्यंतचा प्रवास करू शकते.
मिळणार प्रीमियम फीचर्सचा आनंद
फियरलेस प्लस 75 या व्हेरिएंटमध्ये अनेक आधुनिक सुविधांचा समावेश करण्यात आला आहे:
- डिस्प्ले: 12.3 इंचाची मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम.
- आराम: 6-वे पॉवर्ड ड्रायव्हर सीट आणि फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्स.
- सुरक्षा: 360 डिग्री कॅमेरा आणि ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल.
- मनोरंजन: जेबीएल कंपनीची 10 स्पीकर्स असलेली ऑडिओ सिस्टम.
- इतर: 19 इंचाचे अलॉय व्हील्स, वायरलेस चार्जिंग, अॅम्बियंट लाइटिंग आणि मागील खिडक्यांसाठी सनशेड्स.
टाटा मोटर्सच्या या निर्णयामुळे आता ऑफ-रोडिंगची आवड असलेल्या आणि इलेक्ट्रिक कार शोधणाऱ्या ग्राहकांसाठी Harrier EV हा एक किफायतशीर आणि दमदार पर्याय ठरत आहे.
हे देखील वाचा – PM Modi New Record: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नवा विक्रम! लोकशाहीतील सर्वात प्रदीर्घ काळ सत्तेत राहणारे भारतीय नेते










