Tata Nexon: टाटा मोटर्सने (Tata Motors) दिवाळीच्या निमित्ताने आपल्या अनेक लोकप्रिय कारवर आकर्षक सवलती जाहीर केल्या आहेत. या सवलतींमध्ये कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी नेक्सॉन एसयूव्ही (Nexon SUV) देखील समाविष्ट आहे. या महिन्यात ग्राहक नेक्सॉनवर 2 लाख रुपयांपर्यंतचे मोठे लाभ मिळवू शकतात.
या मोठ्या सवलतीचे मुख्य कारण म्हणजे सरकारने लागू केलेला नवीन GST 2.0 आहे. या नवीन नियमामुळे नेक्सॉनच्या किंमतीत थेट 1 लाख 55 हजार रुपयांपर्यंतची कर कपात झाली आहे. यासोबतच, कंपनी अतिरिक्त 45 हजार रुपयांपर्यंतचे लाभ देत आहे, ज्यात कॅश डिस्काउंट, स्क्रॅप ऑफर आणि कॉर्पोरेट डील्सचा समावेश आहे.
नेक्सॉन ठरली टाटाची सप्टेंबरमधील सर्वाधिक विक्री होणारी कार
नेक्सॉन एसयूव्ही गेल्या महिन्यात म्हणजेच सप्टेंबरमध्ये टाटा मोटर्ससाठी सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली. नेक्सॉनच्या उत्कृष्ट कामगिरीमुळेच कंपनीने गेल्या महिन्यात विक्रमी मासिक विक्रीची नोंद केली आहे.
नवीन GST 2.0 नंतर नेक्सॉनच्या किमती (एक्स-शोरूम):
नवीन GST 2.0 लागू झाल्यानंतर नेक्सॉनच्या विविध मॉडेलमध्ये मोठी किंमत कपात झाली आहे. 1.2L टर्बो पेट्रोल-मॅन्युअल (5-स्पीड) स्मार्ट या बेस व्हेरियंटची जुनी किंमत 7,99,990 रुपये होती, ती आता 7,31,890 रुपये झाली आहे. यामुळे ग्राहकांना थेट 68,100 रुपयांचा फायदा झाला आहे.
सर्वात जास्त कपात ही 1.5L टर्बो डिझेल-ऑटो (AMT) फिअरलेस + PS डार्क (Fearless + PS Dark) व्हेरियंटवर झाली आहे. या व्हेरियंटची किंमत 15,59,990 रुपयांवरून 14,05,290 रुपयांपर्यंत खाली आली आहे, म्हणजेच सुमारे 1 लाख 54 हजार 700 रुपयांची कपात झाली आहे.
नेक्सॉनचे प्रमुख फीचर्स:
टाटा नेक्सॉन विविध पॉवरट्रेन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे, ज्यात पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी (CNG) यांचा समावेश आहे. स्मार्ट या बेस व्हेरियंटमध्ये 6 एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम, LED हेडलाईट्स, मल्टिपल ड्राईव्ह मोड्स (ईको, सिटी, स्पोर्ट्स) आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर सारखे महत्त्वाचे फीचर्स मिळतात.
तर टॉप-एंड फियरलेस + PS व्हेरियंटमध्ये 360-डिग्री कॅमेरा, पॅनोरॅमिक सनरूफ, JBL सिस्टमसह सबवूफर आणि व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स सारखे प्रीमियम फीचर्स समाविष्ट आहेत.
हे देखील वाचा – जयपूरच्या SMS हॉस्पिटलमध्ये भीषण आग; 7 रुग्णांचा मृत्यू, कर्मचाऱ्यांवर पळून गेल्याचा आरोप