Budget 125cc Scooters: भारतीय रस्त्यांवर आता साध्या १०० सीसी स्कूटर्सची जागा वेगाने १२५ सीसी स्कूटर्स घेत आहेत. अधिक ताकद, चांगला वेग आणि आधुनिक फीचर्समुळे ग्राहक या सेगमेंटकडे वळत आहेत. विशेष म्हणजे, अनेक नामवंत कंपन्यांच्या दर्जेदार स्कूटर्स १ लाख रुपयांच्या (एक्स-शोरूम) आत सहज उपलब्ध आहेत. तुमच्या सोयीसाठी आम्ही अशा ५ स्कूटर्सची निवड केली आहे ज्या परफॉर्मन्स आणि बजेटमध्ये उजव्या ठरतात.
१. यामाहा फॅसिनो 125 (Yamaha Fascino 125)
ज्यांना गर्दीत उठून दिसणारी आणि वजनाने हलकी स्कूटर हवी आहे, त्यांच्यासाठी फॅसिनो हा उत्तम पर्याय आहे. याचे रेट्रो लूक आणि उत्कृष्ट पेंट क्वालिटी ग्राहकांना आकर्षित करते. ही स्कूटर चालवण्यास अतिशय सुटसुटीत असून, याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 74,910 रुपये आहे.
२. टीव्हीएस एनटॉर्क 125 (TVS Ntorq 125)
तरुणांमध्ये कमालीची क्रेझ असलेल्या या स्कूटरचा लूक अतिशय स्पोर्टी आहे. यात केवळ स्टाईलच नाही, तर टेक-सॅव्ही लोकांसाठी डिजिटल डिस्प्ले आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसारखे प्रगत फीचर्स मिळतात. परफॉर्मेंसवर लक्ष केंद्रित करणाऱ्या या स्कूटरची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 81,250 रुपये इतकी आहे.
३. हिरो डेस्टिनी 125 (Hero Destini 125)
कौटुंबिक वापरासाठी एक आरामदायक पर्याय शोधणाऱ्यांसाठी डेस्टिनी 125 डिझाइन करण्यात आली आहे. याची सीट रुंद असून सस्पेंशन अतिशय मऊ आहे, ज्यामुळे खराब रस्त्यांवरही धक्के जाणवत नाहीत. देखभालीचा खर्च कमी असल्याने ही खिशाला परवडणारी असून, याची किंमत 75,838 रुपयांपासून सुरू होते.
४. होंडा ॲक्टिव्हा 125 (Honda Activa 125)
वर्षानुवर्षे टिकणारी मजबूती आणि विश्वासार्हता हवी असेल, तर ॲक्टिव्हाला पर्याय नाही. याची मेटल बॉडी आणि उत्तम रीसेल व्हॅल्यू यामुळे ग्राहक आजही याला सर्वाधिक पसंती देतात. देशभरातील होंडाचे मोठे सर्व्हिस नेटवर्क ही याची जमेची बाजू आहे. याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 89,652 रुपये आहे.
५. सुझुकी ॲक्सेस 125 (Suzuki Access 125)
मध्यमवर्गीय कुटुंबात सर्वाधिक लोकप्रिय असलेली ही स्कूटर लूक आणि इंजिन परफॉर्मन्सचा योग्य मेळ घालते. यात ३३ लीटरची मोठी अंडरसीट डिकी मिळते, जी मार्केटमध्ये खूप कमी गाड्यांमध्ये आहे. सहज हाताळता येणारी ही स्कूटर 78,184 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध आहे.










