Home / लेख / Budget Sports Bikes: तुम्हालाही आवडतात का स्पोर्टी गाड्या? १.५ लाख रुपयांच्या आत या आहेत ५ सर्वात स्वस्त आणि दमदार स्पोर्ट्स बाइक्स

Budget Sports Bikes: तुम्हालाही आवडतात का स्पोर्टी गाड्या? १.५ लाख रुपयांच्या आत या आहेत ५ सर्वात स्वस्त आणि दमदार स्पोर्ट्स बाइक्स

Budget Sports Bikes: स्पोर्टी लूक आणि जबरदस्त परफॉर्मन्स असणारी बाईक असावी, असे प्रत्येक तरुणाचे स्वप्न असते. मात्र, महागड्या किमतीमुळे अनेकांना...

By: Team Navakal
Budget Sports Bikes
Social + WhatsApp CTA

Budget Sports Bikes: स्पोर्टी लूक आणि जबरदस्त परफॉर्मन्स असणारी बाईक असावी, असे प्रत्येक तरुणाचे स्वप्न असते. मात्र, महागड्या किमतीमुळे अनेकांना हे स्वप्न लांबणीवर टाकावे लागते. तुमच्या याच आवडीचा विचार करून, आज आपण १.५ लाख रुपयांच्या मर्यादेत मिळणाऱ्या अशा ५ स्पोर्ट्स बाईक्सबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या केवळ दिसायला आकर्षक नाहीत, तर मायलेजच्या बाबतीतही खिशाला परवडणाऱ्या आहेत.

बजेटमधील ५ टॉप स्पोर्ट्स बाइक्स:

  1. यामाहा एमटी १५ व्ही२ (Yamaha MT-15 V2): तरुणाईच्या गळ्यातील ताईत असणारी ही बाईक १.५९ लाख ते १.७४ लाख रुपयांच्या रेंजमध्ये येते. १५५ सीसी इंजिन असलेल्या या ‘स्ट्रीटफाइटर’ बाईकमध्ये १८.१ बीएचपी पॉवर मिळते. ४७ किमी प्रति लिटर मायलेज आणि स्लिपर क्लचसारख्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे ही गाडी सध्या बाजारात चर्चेत आहे.
  2. बजाज पल्सर एनएस २०० (Bajaj Pulsar NS200): स्पीडची आवड असणाऱ्यांसाठी ही एक उत्तम निवड आहे. १.३३ लाख ते १.५८ लाख रुपये किमतीच्या या बाईकमध्ये २०० सीसीचे पॉवरफुल इंजिन आहे, जे २४.१ बीएचपी पॉवर देते. ३६ किमी प्रति लिटर मायलेज आणि एग्रेसिव्ह लूक यामुळे ही बाईक हाय-स्पीड राईड्ससाठी खास ओळखली जाते.
  3. बजाज पल्सर एन १६० (Bajaj Pulsar N160): १.१३ लाख ते १.२६ लाख रुपयांच्या दरम्यान उपलब्ध असलेली ही बाईक १५.७ बीएचपी पॉवर देते. ड्युअल चॅनेल ब्रेकिंग सिस्टिम आणि उत्तम रोड प्रेझेन्समुळे ही बाईक सुरक्षिततेच्या दृष्टीनेही चांगली मानली जाते. ४४ किमी प्रति लिटर मायलेज देणारी ही गाडी दैनंदिन वापरासाठी एक उत्तम पर्याय आहे.
  4. टीव्हीएस अपाचे आरटीआर १६० ४व्ही (TVS Apache RTR 160 4V): देशभरात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या स्पोर्ट्स बाईकपैकी ही एक आहे. १.१६ लाख ते १.३९ लाख रुपयांत मिळणाऱ्या या गाडीत १६० सीसी इंजिन असून १७.३ बीएचपी पॉवर मिळते. रेसिंग मोड्स आणि स्टायलिश लूकसाठी प्रसिद्ध असलेल्या या बाईकचे मायलेज ४५ किमी प्रति लिटर इतके आहे.
  5. हिरो एक्सट्रीम १२५ आर (Hero Xtreme 125R): बजेटच्या दृष्टीने सर्वात स्वस्त आणि मस्त पर्याय म्हणजे ही बाईक! ८९ हजार ते १.०४ लाख रुपयांदरम्यान उपलब्ध असलेल्या या बाईकमध्ये १२५ सीसी इंजिन आहे. ११.४ बीएचपी पॉवर आणि तब्बल ६६ किमी प्रति लिटरचे धमाकेदार मायलेज देणारी ही बाईक लूक आणि बचतीचा उत्तम संगम आहे.
Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या