तुमची पहिली कार खरेदी करताय? 5 लाखांच्या आत मिळणारे ‘हे’ 5 पर्याय आहेत सर्वोत्तम

Best Cars Under 5 Lakh in India

Best Cars Under 5 Lakh in India: तुम्ही जर नवीन गाडी खरेदी करण्याचा विचार करत असाल व बजेट 5 लाख रुपयांपेक्षा (Best Cars Under 5 Lakh in India) कमी असेल तर काळजी करण्याचे कारण नाही. भारतीय बाजारात या बजेटमध्ये येणाऱ्या अनेक चांगल्या कार उपलब्ध आहे.

भारतीय बाजारात कमी बजेटच्या गाड्यांना नेहमीच जास्त मागणी असते. जर तुम्हीही स्वस्त गाडीच्या शोधात असाल, तर आम्ही तुमच्यासाठी अशा पाच गाड्यांची यादी घेऊन आलो आहोत. 5 लाखांच्या (Best Affordable Cars in India 2025) बजेटमध्ये येणाऱ्या या गाड्यांविषयी जाणून घेऊया.

मारुती अल्टो के10 – मारुती अल्टो के10 ही भारतातील सर्वात परवडणाऱ्या पेट्रोल गाड्यांपैकी एक आहे. तिची एक्स-शोरूम किंमत 4.09 लाख रुपयांपासून सुरू होते. यात 1.0 लिटरचे पेट्रोल इंजिन आहे, जे 65.7 बीएचपी पॉवर देते आणि 24.9 किलोमीटर प्रति लिटर इतके मायलेज देते. यामध्ये 7 इंचाची टचस्क्रीन, 6 एअरबॅग आणि व्हॉईस कंट्रोल स्टेअरिंग यांसारखी फीचर्स उपलब्ध आहेत.

टाटा टियागो – सुरक्षिततेसाठी ओळखली जाणारी टाटा टियागोची सुरुवातीची किंमत 4.99 लाख रुपये आहे. ही कार 1.2 लिटरच्या पेट्रोल इंजिनसह येते, जे 86 पीएस पॉवर देते. सुरक्षिततेच्या बाबतीत या गाडीला 4-स्टार रेटिंग मिळाले आहे. यात ड्युअल एअरबॅग आणि एबीएस सारखी फीचर्स आहेत. याचा सीएनजी पर्यायही उपलब्ध आहे.

एमजी कॉमेट ईव्ही – एमजी कॉमेट ईव्हीची किंमत 4.99 लाख रुपयांपासून सुरू होते. ही छोटी इलेक्ट्रिक कार शहरात गाडी चालवण्यासाठी एक चांगला पर्याय आहे. यात 17.3 kWh बॅटरी पॅक आहे, जो 230 किलोमीटरची रेंज देतो.

रेनो क्विड – रेनो क्विड ही एक परवडणारी हॅचबॅक कार आहे, ज्याची एक्स-शोरूम किंमत 4.70 लाख रुपयांपासून सुरू होते. यामध्ये 1.0 लिटरचे पेट्रोल इंजिन आहे, जे 67 बीएचपी पॉवर देते आणि 22 किलोमीटर प्रति लिटरपर्यंत मायलेज देते. या गाडीमध्ये 8 इंचाची टचस्क्रीन, ड्युअल एअरबॅग आणि रिअर पार्किंग सेन्सर्स अशी फीचर्स मिळतात.

वायवे इवा – वायवे मोबिलिटीची ‘इवा’ ही भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार आहे. तिची एक्स-शोरूम किंमत 3.25 लाख रुपयांपासून सुरू होते. ही कार पुणेस्थित स्टार्टअप कंपनीने सादर केली होती. सर्वात खास गोष्ट म्हणजे ही कार सौर ऊर्जेवर चार्ज होते आणि एका चार्जमध्ये 250 किलोमीटरची रेंज देते.

या गाड्या कमी बजेटमध्ये उत्तम परफॉर्मन्स आणि फीचर्स देतात. तुम्ही देखील कमी बजेटमध्ये कार शोधत असाल तर या पर्यायांचा नक्कीच विचार करू शकता.