Home / लेख / Best Mileage Cars: ‘या’ आहेत भारतातील सर्वाधिक मायलेज देणाऱ्या टॉप 5 कार्स; पाहा संपूर्ण यादी

Best Mileage Cars: ‘या’ आहेत भारतातील सर्वाधिक मायलेज देणाऱ्या टॉप 5 कार्स; पाहा संपूर्ण यादी

Best Mileage Cars: भारतातील सामान्य माणूस नवीन गाडी घेताना फिचर्स किंवा रंगापेक्षाही ‘मायलेज’ला सर्वाधिक महत्त्व देतो. पेट्रोलच्या सातत्याने बदलणाऱ्या किमतींमुळे...

By: Team Navakal
Best Mileage Cars
Social + WhatsApp CTA

Best Mileage Cars: भारतातील सामान्य माणूस नवीन गाडी घेताना फिचर्स किंवा रंगापेक्षाही ‘मायलेज’ला सर्वाधिक महत्त्व देतो. पेट्रोलच्या सातत्याने बदलणाऱ्या किमतींमुळे खिशावरचा ताण कमी करणारी कार प्रत्येकाला हवी असते.

जर तुम्हीही कमीत कमी इंधनात जास्तीत जास्त अंतर कापणारी कार शोधत असाल, तर भारतीय बाजारपेठेत असे काही पर्याय आहेत जे १ लिटर पेट्रोलमध्ये २५ ते २८ किलोमीटरपर्यंत धावू शकतात. यामध्ये प्रामुख्याने पेट्रोल आणि हायब्रीड तंत्रज्ञानाचा समावेश असलेल्या गाड्या आघाडीवर आहेत.

1. मारुती सुझुकी ग्रँड विटारा (Maruti Grand Vitara)

मायलेजच्या बाबतीत सध्या ही एसयूव्ही सर्वांच्या पुढे आहे. यामध्ये 1.5 लिटरचे स्ट्रॉन्ग हायब्रीड इंजिन असून ते इलेक्ट्रिक मोटरच्या मदतीने चालते. ही कार 27.97 kmpl इतके जबरदस्त मायलेज देते. याची एक्स-शोरूम किंमत 10.77 लाख ते 20.22 लाख रुपयांच्या दरम्यान आहे.

2. टोयोटा अर्बन क्रूझर हायरायडर (Toyota Hyryder)

मारुती ग्रँड विटाराप्रमाणेच टोयोटाच्या या कारमध्येही तेच तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. याचे मायलेज देखील 27.97 kmpl इतकेच आहे. एसयूव्ही सेगमेंटमध्ये उत्तम लूक आणि हायब्रीड इंजिन शोधणाऱ्यांसाठी हा एक दर्जेदार पर्याय आहे. याची किंमत साधारणपणे 10.99 लाख ते 19.99 लाख रुपयांपर्यंत जाते.

3. होंडा सिटी ई:एचईव्ही (Honda City e:HEV)

सेडान गाड्यांच्या शौकीनांसाठी होंडा सिटी हायब्रीड ही सर्वात जास्त इंधन बचत करणारी कार आहे. यामध्ये 1.5 लिटरचे पेट्रोल इंजिन आणि इलेक्ट्रिक मोटरचा संगम पाहायला मिळतो. ही सेडान 27.26 kmpl चे मायलेज देते. या कारची एक्स-शोरूम किंमत सुमारे 20 लाख रुपये आहे.

4. मारुती सुझुकी सेलेरिओ (Maruti Celerio)

जर तुमचे बजेट कमी असेल आणि तुम्हाला फक्त पेट्रोलवर चालणारी अधिक मायलेजची कार हवी असेल, तर सेलेरिओ हा सर्वोत्तम पर्याय आहे. या कारचे वजन कमी असल्यामुळे याचे एएमटी (AMT) व्हेरिएंट 26 kmpl पर्यंत मायलेज देते. मध्यमवर्गीयांच्या पसंतीची ही कार 4.70 लाख ते 6.73 लाख रुपयांच्या किमतीत उपलब्ध आहे.

5. मारुती सुझुकी स्विफ्ट (Maruti Swift)

भारतातील सर्वात लोकप्रिय हॅचबॅक असलेल्या स्विफ्टने आपल्या नवीन इंजिनसह मायलेजमध्ये मोठी सुधारणा केली आहे. स्विफ्टचे एएमटी मॉडेल 25.75 kmpl आणि मॅन्युअल मॉडेल 24.8 kmpl चे मायलेज देते. स्टाईल आणि परफॉर्मन्सचा विचार करता 5.79 लाख ते 8.65 लाख रुपयांच्या किमतीत ही एक व्हॅल्यू फॉर मनी कार ठरते.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या