Affordable Electric Cars India : भारतातील रस्त्यांवर आता हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढताना दिसत आहे. इंधनाचे दर कमी होण्याची चिन्हे नसल्याने मध्यमवर्गीय ग्राहक आता शाश्वत आणि स्वस्त पर्यायाकडे वळत आहेत.
विशेषतः शहरांमध्ये दैनंदिन प्रवासासाठी इलेक्ट्रिक कार अधिक सोयीस्कर आणि किफायतशीर ठरत आहेत. टाटा आणि एमजी मोटर्सने भारतीय ग्राहकांची गरज ओळखून 7 ते 10 लाख रुपयांच्या रेंजमध्ये उत्तम फीचर्स असलेल्या इलेक्ट्रिक गाड्या लाँच केल्या आहेत.
2025 मधील सर्वोत्तम पर्यायांची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे:
1. Tata Tiago EV
हॅचबेक सेगमेंटमध्ये ही कार सध्या भारतीय ग्राहकांची पहिली पसंती बनली आहे. सुरक्षितता आणि परफॉर्मन्स यांचा योग्य मेळ या गाडीत पाहायला मिळतो.
- किंमत: एक्स-शोरूम 7.99 लाख ते 11.44 लाख रुपयांपर्यंत.
- बॅटरी आणि रेंज: यात दोन बॅटरी पर्याय मिळतात. 19.2 kWh बॅटरी पॅक 250 किमीची रेंज देतो, तर 24 kWh बॅटरी पॅक 315 किमीची रेंज देतो.
- वैशिष्ट्ये: क्रूझ कंट्रोल, ऑटो क्लायमेट कंट्रोल, रेन सेन्सिंग वायपर्स आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर. ही कार आपल्या ५ स्टार सुरक्षा रेटिंगसाठी ओळखली जाते.
2. Tata Punch EV
जर तुम्हाला एसयूव्ही लूक आणि जास्त ग्राऊंड क्लिअरन्स हवा असेल, तर टाटा पंच ईव्ही हा एक शक्तिशाली पर्याय आहे.
- किंमत: एक्स-शोरूम 9.99 लाख ते 14.44 लाख रुपयांपर्यंत.
- बॅटरी आणि रेंज: यात 25 kWh (315 किमी रेंज) आणि 35 kWh (421 किमी रेंज) असे दोन मोठे पर्याय दिले आहेत.
- वैशिष्ट्ये: या कारमध्ये 360-डिग्री कॅमेरा, सनरूफ, व्हेंटिलेटेड सीट्स आणि सुरक्षिततेसाठी ६ एअरबॅग्ज देण्यात आल्या आहेत. खराब रस्त्यांवर प्रवासासाठी ही कार सर्वोत्तम आहे.
3. MG Comet EV
ज्यांना शहराच्या गर्दीत छोटी आणि स्मार्ट कार चालवायची आहे, त्यांच्यासाठी एमजी कॉमेट हा सर्वात स्वस्त पर्याय आहे.
- वैशिष्ट्ये: यामध्ये ड्युअल 10.25 इंच स्क्रीन, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्ले, रिअर पार्किंग कॅमेरा यांसारखे हाय-टेक फीचर्स मिळतात.
- किंमत: एक्स-शोरूम 6.99 लाख ते 9.81 लाख रुपयांपर्यंत. मात्र, कंपनीच्या ‘बॅटरी ॲज अ सर्विस’ मॉडेलनुसार ही कार अवघ्या 4.99 लाख रुपयांत घरी नेता येते.
- बॅटरी आणि रेंज: यामध्ये 17.3 kWh ची बॅटरी असून ती एका चार्जवर 230 किमीची रेंज प्रदान करते.
हे देखील वाचा – Ram Sutar : ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चे शिल्पकार राम सुतार यांचे निधन; वयाच्या 100 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास









