Home / लेख / दिवाळी संपताच ग्राहकांना झटका! TVS च्या ‘या’ लोकप्रिय बाईकच्या किंमतीत मोठी वाढ

दिवाळी संपताच ग्राहकांना झटका! TVS च्या ‘या’ लोकप्रिय बाईकच्या किंमतीत मोठी वाढ

TVS Apache RTX 300 : भारतीय बाजारपेठेत अनेक सेगमेंटमध्ये वाहनांची विक्री करणाऱ्या TVS कंपनीने नुकत्याच लाँच केलेल्या TVS Apache RTX...

By: Team Navakal
TVS Apache RTX 300

TVS Apache RTX 300 : भारतीय बाजारपेठेत अनेक सेगमेंटमध्ये वाहनांची विक्री करणाऱ्या TVS कंपनीने नुकत्याच लाँच केलेल्या TVS Apache RTX 300 या ॲडव्हेंचर मोटरसायकलच्या किंमतीत वाढ केली आहे. विशेष म्हणजे ही मोटारसायकल बाजारात येऊन काहीच दिवस झाले असताना कंपनीने हा निर्णय घेतला आहे.

कंपनीने दिवाळीनंतर अचानक या बाईकच्या किंमतीत वाढ केली आहे.

TVS Apache RTX 300 : किंमत वाढली

टीव्हीएसने अपाचे आरटीएक्स 300 मोटरसायकलच्या केवळ एकाच व्हेरियंटची किंमत वाढवली आहे. ही किंमत BTO व्हेरियंटची वाढवण्यात आली आहे, तर बेस आणि टॉप व्हेरियंटच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

रिपोर्ट्सनुसार, या मोटरसायकलच्या किंमतीत 5,000 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

नवीन किंमत

किंमत वाढल्यानंतर आता BTO व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 2.34 लाख रुपये झाली आहे. या मोटरसायकलच्या बेस व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 1.99 लाख रुपयांपासून सुरू होते.

इंजिन आणि फीचर्स

टीव्हीएस अपाचे आरटीएक्स 300 मध्ये 299.1 सीसीचे सिंगल-सिलिंडर लिक्विड-कूल्ड इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 36 पीएसची पॉवर आणि 28.5 न्यूटन मीटरचा टॉर्क निर्माण करते. हे 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह असिस्ट आणि स्लिपर क्लचशी जोडलेले आहे.

या बाईकमध्ये अनेक आकर्षक फीचर्स आहेत. यामध्ये अर्बन, रेन, टूर आणि रॅली मोड्स, ट्रॅक्शन कंट्रोल, एबीएस, 5 इंच टीएफटी डिस्प्ले, क्विकशिफ्टर आणि क्रूझ कंट्रोलसारखे फीचर्स समाविष्ट आहेत.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या