TVS vehicle Price Cut: केंद्र सरकारने नव्याने लागू केलेल्या GST च्या नव्या दरांमुळे वाहन उत्पादक कंपन्यांनी आपल्या वाहनांच्या किमतीत बदल करण्यास सुरुवात केली आहे. देशातील प्रमुख दुचाकी उत्पादक कंपनी TVS Motors ने देखील याचा थेट फायदा ग्राहकांना देत आपल्या 10 स्कूटर आणि मोटरसायकलच्या किमती मोठ्या प्रमाणात कमी केल्या आहेत.
GST कपातीचा थेट फायदा: किती कमी झाली किंमत?
TVS मोटर्सने आपल्या विविध मॉडेल्सवर 3,854 रुपयांपासून ते थेट 9,600 रुपयांपर्यंतची किंमत कमी केली आहे. GST दर कमी झाल्याने एंट्री-लेव्हल स्कूटरपासून ते परफॉर्मन्स मोटरसायकलपर्यंतचे अनेक मॉडेल्स स्वस्त झाले आहेत.
उत्पादनानुसार किमतीतील कपात खालीलप्रमाणे:
TVS मॉडेल | जुन्या किमतीवरील कपात (Reduction) |
Ntorq 150 | 9,600 रुपये |
Star City | 8,564 रुपये |
Ntorq 125 | 7,242 रुपये |
Raider | 7,125 रुपये |
Jupiter 125 | 6,795 रुपये |
Jupiter 110 | 6,481 रुपये |
Zest | 6,291 रुपये |
Radeon | 4,850 रुपये |
Sport | 4,850 रुपये |
XL 100 | 3,854 रुपये |
GST कपातीनंतर TVS च्या दुचाकींचे नवे दर
TVS कडून मिळालेल्या माहितीनुसार, GST कपातीनंतर या 10 दुचाकी मॉडेल्सच्या एक्स-शोरूम किमती खालीलप्रमाणे झाल्या आहेत:
TVS मॉडेल | GST कपातीनंतरची नवी एक्स-शोरूम किंमत |
Ntorq 150 | 1.09 लाख रुपये |
Raider | 80,500 रुपये |
Ntorq 125 | 80,900 रुपये |
Star City | 72,200 रुपये |
Jupiter 125 | 75,600 रुपये |
Jupiter 110 | 72,400 रुपये |
Zest | 70,600 रुपये |
Radeon | 55,100 रुपये |
Sport | 55,100 रुपये |
XL 100 | 43,900 रुपये |
जीएसटी कपातीचा हा थेट परिणाम असून, यामुळे सणासुदीच्या काळात दुचाकी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
हे देखील वाचा – Sedan Car Price: GST 2.0 चा धमाका! Hyundai Aura सह 5 सेडान कार्स झाल्या स्वस्त; 1.20 लाख रुपयांपर्यंतची बचत