Home / लेख / Aadhaar Document List : आधार कार्ड नियमांत मोठे बदल! UIDAI कडून कागदपत्रांच्या यादीत सुधारणा, पहा तपशील

Aadhaar Document List : आधार कार्ड नियमांत मोठे बदल! UIDAI कडून कागदपत्रांच्या यादीत सुधारणा, पहा तपशील

Aadhaar Document List : युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने (UIDAI) आधार कार्ड नोंदणी (Enrolment) आणि माहिती अद्ययावत (Update) करण्याच्या नियमांमध्ये...

By: Team Navakal
Aadhaar Document List
Social + WhatsApp CTA

Aadhaar Document List : युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने (UIDAI) आधार कार्ड नोंदणी (Enrolment) आणि माहिती अद्ययावत (Update) करण्याच्या नियमांमध्ये मोठे आणि महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. . या बदलांमुळे आता नागरिकांना ओळख (Identity), पत्ता (Address), नातेसंबंध (Relationship) किंवा जन्मतारीख (Date of Birth) सिद्ध करण्यासाठी सादर कराव्या लागणाऱ्या कागदपत्रांची यादी सुधारित करण्यात आली आहे.

यादीत करण्यात आलेल्या सुधारणांमुळे लहान मुले, प्रौढ आणि ज्येष्ठ नागरिक अशा सर्व वयोगटातील नागरिकांना आधारशी संबंधित कामे करणे अधिक सुलभ आणि सोयीचे होणार आहे.

ओळख आणि पत्त्यासाठी स्वीकारार्ह नवीन कागदपत्रे

UIDAI ने आता अनेक नवीन शासकीय आणि दैनंदिन कागदपत्रांना आधार नोंदणी आणि अपडेटसाठी मान्यता दिली आहे.

  • मूलभूत ओळखपत्रे: वैध भारतीय पासपोर्ट, शिधापत्रिका (Ration Card), मतदार ओळखपत्र (Voter ID), तसेच ड्रायव्हिंग लायसन्स यांसारखी कागदपत्रे पूर्वीप्रमाणेच ओळख आणि पत्त्याच्या पुराव्यासाठी स्वीकार्य आहेत.
  • पत्ता सिद्ध करण्यासाठी: सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे, पत्त्याचा पुरावा म्हणून आता 3 महिन्यांपेक्षा जुनी नसलेली वीज बिल, पाणी बिल, गॅस बिल किंवा दूरध्वनी/ब्रॉडबँड बिल पावतीचा वापर केला जाऊ शकतो. तसेच, मालमत्ता कर पावती आणि भाडे/विक्री करारपत्र देखील ग्राह्य धरले जाईल.
  • शासकीय ओळखपत्रे: केंद्र किंवा राज्य सरकारच्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांचे ओळखपत्र, निवृत्तीवेतनधारक ओळखपत्र किंवा स्वातंत्र्य सैनिक ओळखपत्र यांचा समावेश आता ओळख आणि पत्त्याच्या पुराव्यासाठी करण्यात आला आहे.

जन्मतारीख आणि नातेसंबंधासाठीचे नवीन नियम

जन्मतारीख (PDB) आणि नातेसंबंधाचा पुरावा (PoR) सिद्ध करण्यासाठीही नियमांमध्ये सवलत देण्यात आली आहे:

  • जन्मतारीख पुरावा: शाळा किंवा विद्यापीठाचे गुणपत्रक (Marksheet/Certificate) किंवा जन्माचा दाखला (Birth Certificate) यासह वैध भारतीय पासपोर्ट आता जन्मतारखेच्या पुराव्यासाठी स्वीकारले जातील.
  • नातेसंबंधाचा पुरावा: कुटुंबातील जवळच्या सदस्याने दिलेले स्वयं-घोषणापत्र, विवाह प्रमाणपत्र किंवा घटस्फोटाचा आदेश (Divorce Decree) यांसारखी कागदपत्रे आता नातेसंबंधाचा पुरावा म्हणून ग्राह्य धरली जाणार आहेत. यामुळे कुटुंबातील सदस्यांना आधार अपडेट करणे सोपे होईल.

विशिष्ट गटांसाठी विशेष कागदपत्रे

5 ते 18 वर्षांदरम्यानच्या मुलांसाठी आधार नोंदणी प्रक्रिया अधिक सुलभ बनवण्यात आली आहे. जन्म प्रमाणपत्र आणि वैध पासपोर्ट व्यतिरिक्त, अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) तसेच अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) किंवा इतर मागासवर्गीय (OBC) प्रमाणपत्रेही स्वीकारली जातील.

याव्यतिरिक्त, ट्रान्सजेंडर किंवा थर्ड जेंडर ओळखपत्रधारक आणि तुरुंगात दाखल होतानाचे कागदपत्र (Prisoner Induction Document) यांचाही समावेश या सुधारित नियमांमध्ये करण्यात आला आहे. यामुळे भारतीय नागरिकांसोबतच ओव्हरसीज सिटिझन ऑफ इंडिया (OCI) कार्डधारक आणि दीर्घकालीन व्हिसा (LTV) धारकांसाठीच्या नियमांमधील गुंतागुंत कमी होण्यास मदत होणार आहे.

हे देखील वाचा – Gautam Gambhir : ‘माझ्या भवितव्याचा निर्णय…’; दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दारूण पराभवानंतर गौतम गंभीरचे मोठे वक्तव्य

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या