UPSC EPFO recruitment 2025: केंद्रीय लोकसेवा आयोगाने ( UPSC) अंमलबजावणी अधिकारी (Enforcement Officer) आणि सहायक भविष्य निर्वाह निधी आयुक्त (Assistant PF Commissioner) या पदांसाठी अर्ज (UPSC EPFO recruitment 2025) मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार यूपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळा upsc.gov.in द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.
अर्ज करण्याची अंतिम मुदत 18 ऑगस्ट 2025 आहे. या भरती (UPSC EPFO recruitment 2025ः मोहिमेतून एकूण 230 पदांची भरती केली जाणार आहे.
पदांचा तपशील
- अंमलबजावणी अधिकारी / लेखा अधिकारी (EO/AO): 150 पदे
- सहायक भविष्य निर्वाह निधी आयुक्त (APFC): 80 पदे
- एकूण रिक्त जागा: 230
महत्त्वाच्या तारखा
- ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख: 18 ऑगस्ट 2025
- अर्ज फॉर्म प्रिंट करण्याची अंतिम तारीख: 18 ऑगस्ट 2025
अर्ज प्रक्रिया
- यूपीएससीच्या अधिकृत ऑनलाइन पोर्टल upsc.gov.in ला भेट द्या.
- ईपीएफओ (EPFO) 2025 भरती लिंकवर क्लिक करा.
- नोंदणी करा आणि आवश्यक तपशील भरा.
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज शुल्क भरा.
- फॉर्म सबमिट करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट काढून ठेवा.
पात्रता निकष आणि वयोमर्यादा:
- शैक्षणिक पात्रता: कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे अनिवार्य आहे.
- अंमलबजावणी अधिकारी / लेखा अधिकारी (EO/AO): कमाल 30 वर्षे.
- सहायक भविष्य निर्वाह निधी आयुक्त (APFC): कमाल 35 वर्षे.
- नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयात सवलत लागू आहे.
निवड प्रक्रिया
निवड प्रक्रिया भरती चाचणी आणि त्यानंतर मुलाखतीवर (Interview) आधारित असेल
अर्ज शुल्क
- सर्वसाधारण/ओबीसी/ईडब्ल्यूएस: 25 रुपये
- महिला/अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/बेंचमार्क अपंगत्व असलेले व्यक्ती: कोणतेही शुल्क नाही
यशस्वी उमेदवारांना भारतभरातील विविध ठिकाणी नियुक्त केले जाईल. वेतन केंद्रीय सरकारच्या ‘गट अ’ (Group A) पदांसाठीच्या नियमांनुसार असेल. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी यूपीएससीच्या अधिकृत सवेबसाइटवरील संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.