Best Sandwiches List | प्रसिद्ध पाककला मार्गदर्शक ‘टेस्टॲटलस’ने जुलै 2025 साठी जगभरातील 100 सर्वोत्तम सँडविचची नवी यादी जाहीर केली आहे. या यादीत मध्यपूर्वेतील ‘शवारमा’ने पहिले स्थान पटकावले, तर भारताचा लाडका वडापाव 26व्या क्रमांकावर पोहोचला आहे.
16,500 हून अधिक जणांच्या रेटिंगवर आधारित ही यादी असून, वडापावने जानेवारीतील 39व्या स्थानातून मोठी झेप घेतली आहे.
शवारमाची लोकप्रियता
‘शवारमा’ हे मध्यपूर्वेतील लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे, जे मसालेदार मांसाच्या तुकड्यांपासून बनते आणि पिटा किंवा फ्लॅटब्रेडमध्ये गुंडाळले जाते. ऑटोमन साम्राज्यापासून सुरू झालेली ही रेसिपी कोकरू, चिकन किंवा बीफसह शिजवली जाते, ज्यामुळे त्याला रसाळ चव येते. ही यादीतील अव्वल डिश ठरली आहे.
वडापावची जागतिक ओळख
मुंबईचा हक्काचा वडापाव, ज्याची सुरुवात 1960 च्या दशकात दादर रेल्वे स्थानकाजवळ झाली, आता जागतिक पातळीवर नाव कमावत आहे. बटाट्याच्या मसालेदार पदार्थाने 26वे स्थान मिळवत भारतीय स्ट्रीट फूडच्या लोकप्रियतेत वाढ दर्शवली आहे. आज तो स्टॉलपासून रेस्टॉरंटपर्यंत सर्वत्र उपलब्ध आहे.
टॉप 10 सँडविच
- शवारमा (लेबनॉन)
- बान्ह मी (व्हिएतनाम)
- टॉम्बिक डोनर (तुर्कस्तान)
- मीट अँड कोल्ड कट्स बान्ह मी (व्हिएतनाम)
- रोस्टेड पोर्क बेली बान्ह मी (व्हिएतनाम)
- पॅनिनो कोल पोल्पो (इटली)
- टॉर्टास (मेक्सिको)
- लॉबस्टर रोल (यूएसए)
- बुतिफारा (पेरू)
- सँडविच डी लोमो (अर्जेंटिना)