Vasai Student Death : काळ कितीही बदला तरी भारतातील जुन्या परंपरा सण आणि मोठ्यांनी दिलेली शिकवण हे भारतातील लोक कधीच विसरत नाही. फार जुन्या काळापासून ज्ञानाचा वारसा आपण भारतीय अगदी उराशी घेऊन जपत आलो आहोत मग त्यात किती बदल असला तरी आपल्यासाठी ज्ञानच महत्व कधीही कमी झालं नाही. आणि याच ज्ञानाचा मुख्य भाग म्हणजे शाळेतले शिक्षक. पुरातन काळापासून शिक्षकांना सगळ्यात वरचे स्थान दिले आहे. त्यांमुळे गुरु आणि शिष्य हे नाते आणि यांच्यातला दुर्मिळ ऋणानुबंध हा अधिक पवित्र मानला जातो. पण आता खरच हे नातं तितकं दुर्मिळ राहील आहे का? आज काल गुरु शिष्याच्या नात्यावर बोट उचलणाऱ्या अनेक बातम्या समाजमाध्यमांमध्ये अगदी वेगाने पसरताना आपण पाहतो. आणि आता अशीच एक घटना घडली आहे ती वसईतील एका शाळेत.
सुरवातीच्या काळात शिक्षक जी शिक्षा देत ती शिष्य निपुटपणे सहन करायचा अर्थात त्यात त्याच भलंच असायचं. पण आता काळ बदला शिक्षकही बदले पण आधीच्या काळात शिक्षकाने कितीही शिक्षा दिली तरी शिष्याबद्दलची माया आणि आस्था हि त्यांच्या डोळ्यात आणि त्यांच्या वागणुकीतून देखील दिसायची. तसेच शिक्षा देखील तितक्याच सौम्य असायच्या. पण आताच्या शिक्षा या जीवघेण्या ठरत चालल्या आहेत. वसईत शाळेत येण्यास उशीर झाल्याने वसईतील एका शाळेत शिक्षकाने विद्यार्थ्यांना उठाबशा काढण्याची शिक्षा दिली, इथं पर्यंत सगळं ठीक होत अर्थात या आधीही बऱ्याचदा हि शिक्षा शिक्षकांनी दिली आहे. पण आजकालच्या पिढीची शारीरिक ताकत आणि मानसिकता पाहता हि शिक्षा या सगळ्या गोष्टींना आवाहन देणारीच ठरते. वसईत शाळेत येण्यास उशीर झाल्याने शाळेत शिक्षकाने विद्यार्थ्यांना उठाबशा काढण्याची शिक्षा दिली होती, परंतु त्यातील एका सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला याचा त्रास झाला आणि तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आणि ह्या घटनेला गंभीर स्वरूप मिळाले. आपण किती समजुदार पणाचे नारे लावले तरीही एवढ्याश्या जीवाला होणार त्रास त्यांना दिसला नाही.
आणि या नंतर या घटनेचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटू लागले. या घटनेची चौकशी करण्यासाठी आता जिल्हा शिक्षण विभागाकडून उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली असलायची माहिती देखील आहे. त्यातून येणाऱ्या अहवालानंतर आता त्यावर कारवाई केली जाणार आहे. प्रत्यक वेळी शारीरिक शिक्षा देऊनच मुलं सुधारतात असे नाही. शिक्षकाने आपल्या बौद्धिक क्षमतेचा वापर करून त्यावर योग्य युक्ती लढवणे देखील तितकेच गरजेचे आहे.
वसईत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना १०० उठाबशा काढण्याची शिक्षा दिली होती. यात काही विद्यार्थ्यांनी दप्तर खांद्यावर लावूनच उठाबशा काढल्या. यात या चिमुरडीचा देखील समावेश होता. शाळेतून घरी परतल्यानंतर या विद्यार्थिनीची अचानक तब्येत बिघडली. त्यामुळे तिला सुरुवातीला वसईतील आस्था रुग्णालय, तेथून अन्य एका रुग्णालयात तात्काळ दाखल करण्यात आले, मात्र प्रकृती खालावल्याने तिला मुंबईतील जे. जे. रुग्णालयात हलवण्यात आलं. आणि या उपचार दरम्यानच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. शिक्षणधोरणातील बदल यावर अधिक महत्वाचे आहेत. आजची जेन झी पिढी आणि त्यांच्यातले चांगले वाईट गुण ओळखून त्यावर युक्तीने काम करणे गजरेचे आहे. त्यासाठी आदर्श संवेदनशील शिक्षणवर्ग तयार करणे देखील अत्यंत गरजेचे आहे. आज कालच्या जेन झी ना सांभाळणं कठीणच. त्यासाठी वेगळ्या प्रकारची धोरणे असतील तर यावर मार्ग काढणे अधिक सोप्पे जाईल.
हे देखील वाचा – Best 5G Phones : 15 हजारांच्या बजेटमधील सर्वोत्तम 5G स्मार्टफोन; कमी बजेटमध्ये जबरदस्त कॅमेरा-दमदार बॅटरी









