iPhone 16 price cut : जर तुम्ही नवीन आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर विजय सेल्सने तुमच्यासाठी ‘ॲपल डेज 2026’ सेल आणला आहे. या सेलमध्ये iPhone 16 सीरीजसह संपूर्ण आयफोन रेंजवर भारी डिस्काउंट दिला जात आहे. ग्राहक बँक डिस्काउंट, एक्सचेंज बोनस आणि रिवॉर्ड पॉइंट्सचा वापर करून हजारो रुपयांची बचत करू शकतात.
iPhone 16 आणि iPhone 16 Plus वर जबरदस्त ऑफर
iPhone 16 (128GB): या फोनची मूळ किंमत 69,900 रुपये आहे, मात्र सेलमध्ये तो 66,490 रुपयांना उपलब्ध आहे. जर तुम्ही अॅक्सिस, आयसीआयसीआय किंवा एसबीआय बँक कार्ड वापरले, तर तुम्हाला 2,000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळेल, ज्यामुळे प्रभावी किंमत 64,490 रुपये होईल. याव्यतिरिक्त, निवडक मॉडेल्सवर 10,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस देखील मिळत आहे.
iPhone 16 Plus (128GB): 79,900 रुपये किंमत असलेला हा फोन सध्या 73,490 रुपयांना मिळत आहे. बँक ऑफर्सचा लाभ घेतल्यास हा फोन केवळ 71,490 रुपयांमध्ये तुमचा होऊ शकतो. मोठ्या स्क्रीनचा अनुभव घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी ही एक ‘बेस्ट डील’ आहे.
iPhone 16e वरही मोठी सवलत
ॲपलने नुकताच लाँच केलेला iPhone 16e देखील या सेलमध्ये स्वस्त झाला आहे. 59,900 रुपयांना लाँच झालेला हा फोन आता 55,690 रुपयांना खरेदी करता येईल. बँक कार्ड्सवर मिळणाऱ्या 2,000 रुपयांच्या सवलतीनंतर याची किंमत केवळ 53,690 रुपये इतकी कमी होते.
विजया सेल्सच्या या सेलमध्ये जुना फोन बदलून नवीन आयफोन घेणे आता अधिक सोपे आणि स्वस्त झाले आहे. स्टॉक संपण्यापूर्वी या ऑफर्सचा लाभ घेणे फायदेशीर ठरेल.










