VinFast EV India: व्हिएतनाममधील इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी VinFast ने भारतीय बाजारपेठेत प्रवेश केला आहे. कंपनीने आपल्या दोन इलेक्ट्रिक एसयूव्ही VinFast VF6 आणि VF7 भारतात लाँच केल्या आहेत.
VinFast VF6: डिझाइन आणि फीचर्स
VF6 ला कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक एसयूव्ही सेगमेंटमध्ये लाँच करण्यात आले आहे. या कारमध्ये V-आकाराचे LED DRL, 18 इंच ड्युअल-टोन अलॉय व्हील्स, आणि रुंद ब्लॅक क्लॅडिंग देण्यात आली आहे. इंटिरियरमध्ये 12.9 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, गुगल ॲप्स, व्हॉइस असिस्टंट, पॅनोरामिक ग्लास रूफ, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स आणि ड्यूल-झोन क्लायमेट कंट्रोल यांसारखे फीचर्स आहेत. सुरक्षेसाठी यात 360-डिग्री कॅमेरा, 7 एअरबॅग्स, ADAS (लेव्हल-2) आणि रेन-सेन्सिंग वायपर देण्यात आले आहेत.
VinFast VF6 मध्ये 59.6 kWh ची बॅटरी आहे, जी दोन व्हेरिएंटमध्ये येते. Earth व्हेरिएंट 468 किमी आणि Wind व्हेरिएंट 463 किमीपर्यंतची रेंज देते. ही कार फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते, ज्यामुळे 30 मिनिटांत 20 ते 80% चार्ज होते.
VinFast VF6 ची सुरुवातीची किंमत 16.49 लाख रुपये आहे. भारतीय बाजारात ही Hyundai Creta Electric, MG ZS EV आणि Tata Curvv EV शी स्पर्धा करेल.
VinFast VF7: डिझाइन आणि फीचर्स
VF7 ला उत्कृष्ट डिझाइनसह लाँच करण्यात आले आहे. यात 12.9 इंच मोठी सेंट्रल टचस्क्रीन, हेड्स-अप डिस्प्ले (HUD), पॅनोरामिक ग्लास रूफ आणि व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स आहेत. सुरक्षेसाठी यात 360-डिग्री कॅमेरा, 7 एअरबॅग आणि लेव्हल-2 ADAS देण्यात आले आहे.
VF7 च्या Earth व्हेरिएंटमध्ये 59.6 kWh बॅटरी आहे. इतर व्हेरिएंटमध्ये 70.8 kWh LFP बॅटरी आहे. या कारचे FWD व्हेरिएंट 532 किमी आणि AWD व्हेरिएंट 510 किमीची रेंज देते. कंपनी बॅटरीवर 10 वर्षे किंवा 2 लाख किमीची वॉरंटी देत आहे.
VinFast VF7 ची सुरुवातीची किंमत 20.89 लाख रुपये आहे. ही कार Tata Curvv EV, Hyundai Creta Electric आणि Mahindra BE 6 ला टक्कर देईल.
ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा
हे देखील वाचा – ड्रायव्हिंग लायसन्सवरील पत्ता बदलणे झाले सोपे; जाणून घ्या ऑनलाइन आणि ऑफलाइन प्रक्रिया