दमदार फीचर्ससह Vivo T4 Ultra भारतात लॉन्च! 5,500mAh बॅटरी – 32MP सेल्फी कॅमेऱ्यासह मिळेल बरचं काही

Vivo T4 Ultra

Vivo T4 Ultra | व्हिवोने आपला नवीन स्मार्टफोन Vivo T4 Ultra भारतात लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 9300+ चिपसेट आणि 90W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येणाऱ्या 5,500mAh बॅटरीसह येतो.

यात 50-मेगापिक्सलचा पेरिस्कोप टेलिफोटो शूटरसह ट्रिपल रिअर कॅमेरा युनिट आणि 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. व्हिवोच्या या नवीन फोनविषयी सविस्तर जाणून घेऊयात.

Vivo T4 Ultra ची भारतातील किंमत आणि उपलब्धता

भारतात Vivo T4 Ultra च्या 8GB RAM आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 37,999 रुपये आहे. तर, 12GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 39,999 रुपये आणि 12GB RAM + 512GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 41,999 रुपये आहे.

हा फोन ‘मीटिओर ग्रे’ आणि ‘फिनिक्स गोल्ड’ या दोन आकर्षक रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. 18 जूनपासून फ्लिपकार्ट, Vivo इंडिया ई-स्टोअर आणि निवडक ऑफलाइन रिटेल स्टोअर्समध्ये हा फोन खरेदीसाठी उपलब्ध होईल.

Vivo T4 Ultra: वैशिष्ट्ये आणि फीचर्स

डिस्प्ले: Vivo T4 Ultra मध्ये 6.67-इंचाचा 1.5K (1,260×2,800 पिक्सेल) क्वाड-कर्व्ह्ड AMOLED डिस्प्ले आहे. याचा रिफ्रेश रेट 120Hz पर्यंत, टच सॅम्पलिंग रेट 300Hz पर्यंत, स्थानिक पीक ब्राइटनेस लेव्हल 5,000 nits पर्यंत आणि 2,160Hz PWM डिमिंग रेट आहे. स्क्रीन HDR10+ ला सपोर्ट करते आणि त्याला SGS लो ब्लू लाइट सर्टिफिकेशन मिळाले आहे.

प्रोसेसर आणि स्टोरेज: हा फोन 4nm ऑक्टा-कोर MediaTek Dimensity 9300+ SoC सह येतो, सोबत 12GB पर्यंत LPDDR5 RAM आणि 512GB पर्यंत UFS 3.1 ऑनबोर्ड स्टोरेज दिले आहे. हा Android 15 आधारित FuntouchOS 15 सह येतो.

कॅमेरा: Vivo T4 Ultra मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा युनिट आहे. यात 50-मेगापिक्सलचा Sony IMX921 मुख्य सेन्सर आहे. याशिवाय, 8-मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड-अँगल लेन्ससह सेन्सर आणि 50-मेगापिक्सलचा Sony IMX882 पेरिस्कोप टेलिफोटो कॅमेरा मिळतो. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी यात 32-मेगापिक्सलचा फ्रंट-फेसिंग सेन्सर आहे.

बॅटरी आणि कनेक्टिव्हिटी: Vivo T4 Ultra मध्ये 5,500mAh बॅटरी आहे, जी 90W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये ड्युअल नॅनो सिम, 5G, 4G, ब्लूटूथ 5.4, वाय-फाय, OTG, NavIC सह GPS आणि USB Type-C पोर्ट दिले आहेत. बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनसाठी यात इन-डिस्प्ले ऑप्टिकल फिंगरप्रिंट सेन्सर आहे.