Vivo X200 FE India Launch | व्हिवो कंपनीने आपला नवीन स्मार्टफोन Vivo X200 FE भारतात लाँच केला आहे.. फोनसोबतच कंपनी व्हिवो एक्स फोल्ड 5 हा फोल्डेबल फोनही सादर केला. व्हिवो एक्स200 एफई हा व्हिवो एक्स200 सीरिजमधील एक महत्त्वाचा स्मार्टफोन असून, तो कॉम्पॅक्ट डिझाइन आणि पॉवरफुल वैशिष्ट्यांसह येतो.
Vivo X200 FE: किंमत आणि कधी मिळेल?
व्हिवो एक्स200 एफई ची भारतातील किंमत 54,999 रुपयांपासून सुरू होते, ज्यात 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज पर्याय आहे. तर, 16GB रॅम आणि 512GB स्टोरेज असलेल्या व्हेरियंटची किंमत 59,999 रुपये आहे. हा फोन एम्बर यलो, फ्रॉस्ट ब्लू आणि लक्स ग्रे या तीन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे.
या हँडसेटची विक्री 23 जुलैपासून फ्लिपकार्ट आणि व्हिवो इंडिया ई-स्टोअर वर सुरू होईल. सध्या हा फोन प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहे.
व्हिवो एक्स200 एफईची खास वैशिष्ट्ये:
- डिस्प्ले: 6.31 इंचाचा 1.5K (1,216×2,640 पिक्सेल) एमोलेड डिस्प्ले दिला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 1,800 निट्सच्या पीक ब्राइटनेससह येतो.
- प्रोसेसर: मीडियाटेक डायमेन्सिटी 9300+ चिपसेट दिला आहे, ज्यामुळे फोन वेगाने काम करतो.
- रॅम आणि स्टोरेज: 16GB पर्यंत LPDDR5X रॅम आणि 512GB पर्यंत UFS 3.1 ऑनबोर्ड स्टोरेज मिळेल.
- ऑपरेटिंग सिस्टम: अँड्रॉइड 15 आधारित फनटचओएस 15 वर हा फोन काम करतो.
शानदार कॅमेरा आणि बॅटरी क्षमता:
- फोटोग्राफीसाठी, व्हिवो एक्स200 एफई मध्ये झाईस-बॅक्ड ट्रिपल रियर कॅमेरा युनिट मिळेल:
- ऑप्टिकल इमेज स्टेबिलायझेशन सपोर्टसह 50 मेगापिक्सेलचा सोनी IMX921 प्रायमरी सेन्सर
- 120 अंश वाइड अँगल लेन्ससह 8 मेगापिक्सेल सेन्सर
- 3x ऑप्टिकल झूम आणि OIS सपोर्टसह 50 मेगापिक्सेलचा सोनी IMX882 पेरिस्कोप टेलीफोटो शूटर
- सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी, फोनमध्ये 50 मेगापिक्सेलचा फ्रंट सेन्सर दिला आहे.
या फोनमध्ये 6,500mAh ची पॉवरफुल बॅटरी दिली असून, ती 90W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. सुरक्षेसाठी यात इन-डिस्प्ले ऑप्टिकल फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो. तसेच, हा हँडसेट धूळ आणि पाण्यापासून संरक्षणासाठी IP68+IP69 रेटिंग्स दिले आहे.
कनेक्टिव्हिटीसाठी, यात ड्युअल नॅनो सिम, 5G, 4G, वाय-फाय, ब्लूटूथ 5.4, जीपीएस, ओटीजी, एनएफसी आणि यूएसबी टाइप-सी यांसारखी वैशिष्ट्ये आहेत.