Sanchar Saathi App : केंद्र सरकारने भारतातील स्मार्टफोन कंपन्यांना ‘संचार साथी’ (Sanchar Saathi) हे सरकारी सायबर सुरक्षा ॲप्लिकेशन नवीन डिव्हाइसमध्ये प्री-इंस्टॉल करण्यास सांगितले आहे. या ॲपमुळे वापरकर्त्यांना फसवणुकीचे कॉल (आणि संदेश तसेच चोरीला गेलेल्या मोबाईल फोनची माहिती देणे शक्य होते.
रिपोर्टनुसार, दूरसंचार विभागाने (DoT) स्मार्टफोन कंपन्यांना स्पष्टपणे सांगितले आहे की, वापरकर्त्यांना हे ॲप डिलीट करता येऊ नये. उत्पादकांनी विक्रीसाठी आणलेल्या सर्व नवीन डिव्हाइसमध्ये हे ॲप प्री-इंस्टॉल असावे आणि आधीच विकल्या गेलेल्या फोनसाठी हे ॲप उपलब्ध करून देणारे सॉफ्टवेअर अपडेटजारी करावे, असा आग्रह सरकारने धरला आहे.
‘संचार साथी’ ॲप काय आहे?
सध्या ‘संचार साथी’ मोबाईल ॲप आणि वेबसाइटअशा दोन्ही स्वरूपात उपलब्ध आहे, मात्र त्याचा वापर ऐच्छिक आहे.
‘संचार साथी’ वेबसाइटनुसार, हे दूरसंचार विभागाचे नागरिक-केंद्रित पाऊल आहे, जे मोबाईल वापरकर्त्यांना सक्षम करते, त्यांची सुरक्षितता वाढवते आणि सरकारी योजनांबद्दल जागरूकता निर्माण करते.
- सुविधा: हे अनेक नागरिक-केंद्रित सेवा प्रदान करते. याशिवाय, Keep Yourself Awarया सुविधेमुळे वापरकर्त्याला सुरक्षितता आणि दूरसंचारसुरक्षेशी संबंधित नवीनतम अपडेट्स मिळतात.
‘संचार साथी’ ॲपच्या प्रमुख सेवा
हे ॲप विविध सुविधा पुरवते:
- चोरीला गेलेला फोन ब्लॉक करणे: हरवलेला किंवा चोरीला गेलेला मोबाईल फोन ब्लॉक करण्याची सोय यात आहे.
- तुमच्या नावावरील कनेक्शन तपासा: तुमच्या नावावर किती मोबाईल कनेक्शन आहेत, हे तपासण्याची सुविधा.
- ‘चक्षू’द्वारे फसवणुकीची तक्रार: ‘चक्षू’ (Chakshu) नावाच्या पर्यायाद्वारे संशयित फसवणुकीची माहिती देणे.
‘चक्षू’ सुविधा काय आहे?
‘चक्षू’मुळे नागरिक सायबर क्राईम, आर्थिक फसवणूक, बनावटगिरी किंवा कॉल, एसएमएस किंवा व्हॉट्सॲपद्वारे होणाऱ्या गैरवापसासारख्या संशयित फसवणुकीच्या संवादांची तक्रार करू शकतात. दूरसंचार विभाग, पोलीस किंवा सरकारी अधिकारी असल्याचा बनाव, गुंतवणूक किंवा व्यापार संबंधी फसवणूक किंवा बँक, वीज, गॅस, विमा यांच्याशी संबंधित केवायसी (KYC) आणि पेमेंट संबंधी फसवणुकीचे काही उदाहरणे आहेत.
‘चक्षू’चा वापर सायबर गुन्ह्यांची तक्रार करण्यासाठी करता येत नाही, याची नोंद घ्यावी.
हरवलेला किंवा चोरीला गेलेला फोन ब्लॉक करा
या ॲपद्वारे हरवलेल्या किंवा चोरीला गेलेल्या मोबाईल उपकरणांचा मागोवा घेणे आणि त्यांना ब्लॉक करणे शक्य होते.
वापर: ब्लॉक केलेला फोन कोणी वापरण्याचा प्रयत्न केल्यास, त्याची माहिती मिळते. फोन सापडल्यानंतर ॲप किंवा पोर्टलद्वारे त्याला सहज अनब्लॉक करता येते.
IMEI ट्रॅकिंग: इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी (IMEI) या 15-अंकी विशिष्ट कोडवर आधारित, हे ॲप देशभरात हरवलेल्या किंवा चोरीला गेलेल्या फोनचा मागोवा घेण्यास आणि त्यांना ब्लॉक करण्याची परवानगी देते.









