WhatsApp New Feature: तुमची खासगी माहिती, पासवर्ड किंवा ओटीपी व्हॉट्सअॅपवर शेअर करताना आता काळजी करण्याची गरज नाही. व्हॉट्सअॅप आपल्या यूजर्सला गोपनीयतेसाठी एक अत्यंत महत्त्वाचे फिचर घेऊन येत आहे. ‘आफ्टर रीडिंग’ असे या नवीन सुविधेचे नाव असून, यामुळे तुम्ही पाठवलेला मेसेज समोरच्या व्यक्तीने वाचल्यानंतर काही वेळातच दोन्ही बाजूने कायमचा डिलीट होईल.
काय आहे ‘आफ्टर रीडिंग’ फिचर?
सध्या व्हॉट्सअॅपमध्ये मेसेज गायब होण्यासाठी २४ तास, ७ दिवस किंवा ९० दिवसांचे पर्याय उपलब्ध आहेत. मात्र, नवीन फिचर हे अधिक वेगवान आणि सुरक्षित असेल.
- १५ मिनिटांचा टायमर: एकदा का समोरच्या व्यक्तीने तुमचा मेसेज उघडला, की लगेच १५ मिनिटांचा काउंटडाऊन सुरू होईल. हा वेळ संपताच तो मेसेज दोन्ही चॅटमधून आपोआप गायब होईल.
- २४ तासांची मर्यादा: जर समोरच्या व्यक्तीने तो मेसेज २४ तासांच्या आत उघडलाच नाही, तर तो मेसेज आपोआप एक्सपायर होईल.
- ब्लू टिकची अट नाही: विशेष म्हणजे, जर तुम्ही ‘रीड रिसिट्स’ म्हणजेच निळ्या टिकचा पर्याय बंद ठेवला असेल, तरीही व्हॉट्सअॅप मेसेज कधी उघडला गेला हे ओळखून टायमर सुरू करेल.
गोपनीय माहितीसाठी ठरेल वरदान
अनेकदा आपण व्हॉट्सअॅपवर बँक पासवर्ड, घराचा पत्ता, ओटीपी किंवा काही वैयक्तिक फोटो शेअर करतो. हे मेसेज चॅटमध्ये तसेच राहिल्याने माहिती चोरीला जाण्याची भीती असते. नवीन ‘ऑटो-डिलीट’ सिस्टीममुळे ही माहिती वाचली गेल्यावर लगेच नष्ट होईल, ज्यामुळे चॅट हिस्ट्रीमध्ये खाजगी तपशील शिल्लक राहण्याची शक्यता कमी होईल.
‘व्ह्यू वन्स’चा पुढील टप्पा
व्हॉट्सअॅपवर सध्या फोटो आणि व्हिडिओसाठी ‘व्ह्यू वन्स’ हा पर्याय उपलब्ध आहे, ज्यामध्ये एकदा फोटो पाहिला की तो गायब होतो. आता हेच तंत्रज्ञान लिखित मेसेजसाठी देखील अधिक प्रगत स्वरूपात आणले जात आहे. सध्या हे फिचर अँड्रॉइडच्या बीटा व्हर्जनवर तपासले जात असून, लवकरच ते सर्व सामान्य यूजर्ससाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
हे देखील वाचा – Strait of Hormuz Crisis: समुद्रात इराणची ‘वसुली’ सुरू! हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाण्यासाठी जहाजांकडे मागितले 18 कोटी रुपये










