Home / लेख / Travel Guide : 2026 मध्ये फिरायला जायचंय? जानेवारी ते डिसेंबर पूर्ण वर्षाचे ट्रॅव्हल प्लॅनिंग; पाहा कोणत्या महिन्यात कुठे जाणं ठरेल बेस्ट

Travel Guide : 2026 मध्ये फिरायला जायचंय? जानेवारी ते डिसेंबर पूर्ण वर्षाचे ट्रॅव्हल प्लॅनिंग; पाहा कोणत्या महिन्यात कुठे जाणं ठरेल बेस्ट

2026 Travel Guide : प्रवासाची आवड असलेल्या लोकांसाठी 2026 हे वर्ष खूप खास ठरणार आहे. प्रत्येक ठिकाणाला भेट देण्यासाठी एक...

By: Team Navakal
2026 Travel Guide
Social + WhatsApp CTA

2026 Travel Guide : प्रवासाची आवड असलेल्या लोकांसाठी 2026 हे वर्ष खूप खास ठरणार आहे. प्रत्येक ठिकाणाला भेट देण्यासाठी एक ठराविक वेळ असते, जेव्हा तिथले निसर्गसौंदर्य किंवा सांस्कृतिक उत्सव शिखरावर असतात.

तुम्ही बर्फाच्छादित डोंगर, सोनेरी समुद्रकिनारे किंवा रोषणाईने उजळलेले सण शोधत असाल, तर हा महिनानिहाय गाईड तुम्हाला प्रवासाचे अचूक नियोजन करण्यास मदत करेल.

जानेवारी ते जून: वर्षाची धमाकेदार सुरुवात

जानेवारी (युकोन, कॅनडा): उत्तर ध्रुवावरील ‘नॉर्दर्न लाईट्स’ म्हणजेच ध्रुवीय प्रकाश पाहण्यासाठी जानेवारी महिना सर्वोत्तम आहे. कॅनडातील युकोनमध्ये कडाक्याच्या थंडीत ताऱ्यांनी भरलेले आकाश आणि रंगीत प्रकाशाची उधळण पाहण्याचा अनुभव अविस्मरणीय असतो. येथे तुम्ही स्नो-शू हायकिंग आणि डॉग-स्लेड राईडचा आनंद घेऊ शकता.

फेब्रुवारी (होई एन, व्हिएतनाम): फेब्रुवारीमध्ये व्हिएतनाममध्ये लूनर न्यू इयर आणि कंदील उत्सव साजरा केला जातो. होई एनमधील पिवळ्या भिंतींच्या जुन्या गल्ल्या रेशमी कंदिलांनी उजळून निघतात. नदीमध्ये तरंगते दिवे सोडणे आणि रात्रीच्या बाजारात स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेणे हा एक सुखद अनुभव असतो.

मार्च (निझवा, ओमान): उन्हाळ्याची प्रखर उष्णता सुरू होण्यापूर्वी मार्च महिना ओमानमधील निझवा शहरासाठी उत्तम आहे. येथे तुम्ही ऐतिहासिक किल्ले, जुने बाजार आणि वाळवंटातील सफारीचा आनंद घेऊ शकता. रात्रीच्या वेळी वाळवंटातील स्वच्छ आकाश आणि ताऱ्यांचे दर्शन मन प्रसन्न करते.

एप्रिल (फुकुओका, जपान): जपानमध्ये एप्रिल महिना म्हणजे चेरी ब्लॉसमचा काळ. टोकियोमधील गर्दी टाळून तुम्ही फुकुओकामध्ये ‘हानामी’ उत्सवाचा आनंद घेऊ शकता. माईझुरु पार्क गुलाबी फुलांनी बहरलेले असते. येथे तुम्ही ताजी सीफूड आणि प्रसिद्ध रामेनचा आस्वाद घेऊ शकता.

मे (थिंफू, भूतान): मे महिन्यात भूतानमधील हवामान अतिशय आल्हाददायक असते. थिंफूमध्ये बुद्ध जयंतीचा उत्साह पाहायला मिळतो. हिमालयाचे विहंगम दृश्य, प्राचीन मठ आणि तिथली शांतता मनाला उभारी देते. रोडोडेंड्रॉनची फुले या काळात संपूर्ण दरीला रंगीबेरंगी बनवतात.

जून (मालदीव): जूनमध्ये मालदीवमध्ये कोरडा उन्हाळा सुरू होतो, ज्यामुळे इथले समुद्रकिनारे अधिक सुंदर दिसतात. स्कुबा डायव्हिंग आणि स्नॉर्कलिंगसाठी ही सर्वोत्तम वेळ आहे. निळ्याशार पाण्यात वॉटर व्हिलामध्ये राहून तुम्ही सुट्ट्यांचा मनमुराद आनंद घेऊ शकता.

जुलै (स्कॉटलंड): स्कॉटलंडमधील निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी जुलै महिना योग्य आहे. एडिनबर्ग फेस्टिव्हलमध्ये नाटके आणि संगीताची मेजवानी असते. हायलँड्समधील हिरवेगार डोंगर, जुने किल्ले आणि ऐतिहासिक वास्तू पर्यटकांना आकर्षित करतात.

ऑगस्ट (आइसलँड): ऑगस्टमध्ये आइसलँडमध्ये दिवस खूप मोठे असतात. व्हेल वॉचिंग आणि गरम पाण्याच्या झऱ्यांमध्ये (Blue Lagoon) स्नान करण्यासाठी ही वेळ उत्तम आहे. धबधबे आणि ज्वालामुखीच्या खडकाळ जमिनीचा विलोभनीय नजारा येथे पाहायला मिळतो.

सप्टेंबर (जपान): सप्टेंबरमध्ये जपानमध्ये हवेत गारवा निर्माण होतो. झाडांची पाने लाल-केशरी रंगात बदलू लागतात, ज्याला ‘फॉलो फोलिएज’ म्हणतात. क्योटोमधील मंदिरांना भेट देण्यासाठी आणि स्थानिक साके (Sake) चा आस्वाद घेण्यासाठी हे हवामान उत्तम आहे.

ऑक्टोबर (जयपूर, भारत): भारतातील जयपूर शहरात ऑक्टोबरमध्ये दिवाळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा होतो. संपूर्ण ‘गुलाबी शहर’ दिव्यांनी उजळून निघते. इथल्या किल्ल्यांची रोषणाई आणि राजस्थानी दाल-बाटी चुरमा ही पर्यटकांची पहिली पसंती असते.

नोव्हेंबर (सायुलिता, मेक्सिको): मेक्सिकोमधील प्रसिद्ध ‘डे ऑफ द डेड’ हा उत्सव नोव्हेंबरमध्ये सायुलितामध्ये पाहायला मिळतो. रस्त्यांवर फुलांची सजावट, संगीत आणि मिरवणुका काढल्या जातात. समुद्रकिनारी राहून या अनोख्या संस्कृतीचा अनुभव घेणे अविस्मरणीय ठरते.

डिसेंबर (मेरानो, इटली): नाताळचा आनंद घेण्यासाठी इटलीतील मेरानो हे ठिकाण उत्तम आहे. आल्प्स पर्वत रांगांच्या कुशीत वसलेले हे शहर ख्रिसमस मार्केटसाठी प्रसिद्ध आहे. बर्फाच्छादित पर्वत, गरम वाईन आणि स्थानिक इटालियन पदार्थांमुळे वर्षाचा शेवट गोड होतो.

हे देखील वाचा – Health Tips: स्वस्त पण मस्त! फुटाणे आणि मनुके एकत्र खाण्याचे ‘हे’ 10 फायदे वाचून व्हाल थक्क; महागड्या सुपरफूड्सची गरजच नाही

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या