Home / लेख / Xiaomi च्या दमदार Smartphone वर तब्बल 16 हजारांची सूट, फीचर्स खूपच भन्नाट; पाहा डिटेल्स

Xiaomi च्या दमदार Smartphone वर तब्बल 16 हजारांची सूट, फीचर्स खूपच भन्नाट; पाहा डिटेल्स

Xiaomi 14 Civi हा स्मार्टफोन आता ॲमेझॉनवर 16 हजार रुपयांहून अधिक किमतीच्या मोठ्या सवलतीसह उपलब्ध आहे. या फोनचे आकर्षक डिझाइन,...

By: Team Navakal
Xiaomi 14 Civi
Social + WhatsApp CTA

Xiaomi 14 Civi हा स्मार्टफोन आता ॲमेझॉनवर 16 हजार रुपयांहून अधिक किमतीच्या मोठ्या सवलतीसह उपलब्ध आहे. या फोनचे आकर्षक डिझाइन, उत्कृष्ट डिस्प्ले, परफॉर्मेंस आणि कॅमेरा सिस्टीम यामुळे तो दैनंदिन वापरासाठी एकप्रीमियम अनुभव देतो.

अशा मोठ्या डील्स जास्त काळ उपलब्ध नसतात, त्यामुळे जर Xiaomi 14 Civi तुमच्या गरजा पूर्ण करत असेल, तर तो लवकर खरेदी करणे फायदेशीर ठरेल.

Xiaomi 14 Civi वरील ऑफर

Xiaomi 14 Civi वर उपलब्ध डील Xiaomi 14 Civi भारतात 42,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च करण्यात आला होता.

या स्मार्टफोनचे 8 GB + 256 GB स्टोरेज मॉडेल सध्या ॲमेझॉनवर 26,249 रुपयांना लिस्टेड आहे. याचा अर्थ ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म यावर 16,750 रुपयांची मोठी सवलत देत आहे.

या बचतीमध्ये आणखी वाढ करण्यासाठी, तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज देखील करू शकता. एक्सचेंजमध्ये 24,800 रुपयांपर्यंतची अतिरिक्त सूट दिली जात आहे. मात्र, ही किंमत जुन्या फोनच्या स्थितीवर अवलंबून असेल.

Xiaomi 14 Civi चे महत्त्वाचे वैशिष्ट्ये

प्रोसेसर: Xiaomi 14 Civi मध्ये Snapdragon 8s Gen 3 प्रोसेसर मिळतो.

बॅटरी: हा फोन 4,700 mAh बॅटरीसह येतो, जी 67 W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

डिस्प्ले: यात 6.55 इंचाचा LTPO AMOLED स्क्रीन आहे, जो 120 Hz रिफ्रेश रेट, 3,000 nits पीक ब्राइटनेस आणि 1.5K रिझोल्यूशनसह येतो. स्क्रीन HDR10+, Dolby Vision आणि 68 अब्ज कलर्सलाही सपोर्ट करते. संरक्षणासाठी यावर Corning Gorilla Glass Victus 2 चे कवच दिले आहे.

कॅमेरा: फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ट्रिपल-रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 50 MP चा मुख्य कॅमेरा (PDAF आणि OIS), 50 MP चा टेलीफोटो लेन्स (2x ऑप्टिकल झूमसह) आणि 12 MP चा अल्ट्रा-वाइड कॅमेरा मिळतो.

सेल्फी कॅमेरा: सेल्फी आणि व्हिडिओ कॉल्ससाठी फ्रंटमध्ये दोन 32 MP कॅमेरे देण्यात आले आहेत.

हे देखील वाचा – PM Kisan 21st Installment : PM किसान सन्मान निधीचा 21 वा हप्ता जारी! तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झाले का? असे तपासा

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या