Home / महाराष्ट्र / काॅसमॉस बँकेचे संचालकमुकुंद अभ्यंकर यांना शिक्षा

काॅसमॉस बँकेचे संचालकमुकुंद अभ्यंकर यांना शिक्षा

पुणे कारच्या धडकेत महिलेच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी कॉसमॉस बँकेचे संचालक मुकुंद लक्ष्मण अभ्यंकर (८६) यांना न्यायालयाने सहा महिने साधा कारावास...

By: E-Paper Navakal

पुणे

कारच्या धडकेत महिलेच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी कॉसमॉस बँकेचे संचालक मुकुंद लक्ष्मण अभ्यंकर (८६) यांना न्यायालयाने सहा महिने साधा कारावास व १२०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. सी. दुगांवकर यांनी हा निकाल जाहीर केला. दंडाची रक्कम न भरल्यास एक महिने अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असे आदेशात नमूद करण्यात आले.

अरुंधती गिरीश हसबनीस (३०) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. या घटनेबाबत विक्रम सुशील धूत (३५) यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. हा अपघात भांडारकर रस्त्यावरील अभ्युदय बँकेसमोर १७ जुलै २०१६ रोजी दुपारच्या सुमारास झाला होता. अरुंधती या गुडलक चौकाकडे जात असताना त्यांना अभ्यंकर यांच्या कारची धडक बसली त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. अभ्यंकर अपघातानंतर पळून गेले. या खटल्यात सरकारी वकील गिरीश बारगजे यांनी १७ साक्षीदार तपासले. दरम्यान, बचाव पक्षाच्या वतीने युक्तिवाद करताना ॲड. ऋषिकेश गानू म्हणाले, फिर्यादी पक्षाने दाखल केलेले सर्व पुरावे खोटे असून ते मान्य नाहीत. तसेच, सर्व साक्षीदार हे बनावट असून त्यांची साक्ष खोटी आहे. ॲड. बारगजे यांनी आरोपीने केलेला गुन्हा गंभीर स्वरुपाचा आहे. त्याला जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी केली होती.

Web Title:
संबंधित बातम्या