Home / महाराष्ट्र / अकरावी प्रवेश प्रक्रिया पुन्हा एकदा लांबणीवर

अकरावी प्रवेश प्रक्रिया पुन्हा एकदा लांबणीवर

मुंबई – अकरावीची प्रवेश प्रक्रियेच्या नोंदणीपासून सुरू असलेल्या तांत्रिक अडचणींमुळे आज जाहीर होणारी पहिली यादी आता २६ जून रोजी जाहीर...

By: Team Navakal
Social + WhatsApp CTA

मुंबई – अकरावीची प्रवेश प्रक्रियेच्या नोंदणीपासून सुरू असलेल्या तांत्रिक अडचणींमुळे आज जाहीर होणारी पहिली यादी आता २६ जून रोजी जाहीर होणार आहे. त्यामुळे संपूर्ण प्रवेश प्रक्रियाच लांबणीवर पडली आहे.

यंदा शालेय शिक्षण विभागाने इयत्ता १० वीचा निकाल १५ दिवस आधी जाहीर केला.अकरावीच्या प्रवेशासाठी शिक्षण विभागाने स्वतंत्र संकेतस्थळ तयार करून ऑनलाइन प्रक्रिया सुरू केली. त्यानुसार २१ मेपासून अर्ज नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झाली. पण तांत्रिक अडचणींमुळे प्रेवश प्रक्रियेचे वेळापत्रक बदलण्यात आले.

पण सातत्याने निर्माण होणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांची व पालकांची प्रचंड गैरसोय झाली. पूर्वी ठरवलेल्या वेळापत्रकानुसार , २६ मे ते ३ जून दरम्यान ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार होती.तांत्रिक अडचणींमुळे ७ जून रोजी ऑनलाईन नोंदणी पूर्ण करण्यात आली.त्यानंतर १० जून रोजी पहिली जनरल मेरिट यादी प्रसिद्ध होणार होती. पण आता यादी आता २६ जून रोजी जाहीर होणार आहे. या सर्व प्रक्रियेतील दिरंगाईमुळे पालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

Web Title:
For more updates: , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या