Home / मनोरंजन / ‘छावा’ सिनेमाची बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई, या राज्यांनी चित्रपट केला करमुक्त 

‘छावा’ सिनेमाची बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई, या राज्यांनी चित्रपट केला करमुक्त 

Chhaava Movie: छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित ‘छावा’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. अभिनेता विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने...

By: Team Navakal

Chhaava Movie: छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित ‘छावा’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. अभिनेता विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने एका आठवड्यातच बॉक्स ऑफिसवर 200 कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे. या चित्रपटात विकीने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे.

हा चित्रपट करमुक्त करण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. ही मागणी पाहता मध्यप्रदेशमध्ये चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे. मध्यप्रदेश पाठोपाठ आता गोवा सरकारने देखील असाच निर्णय घेतला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या 395व्या जयंतीनिमित्ताने गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी छावा चित्रपट राज्यात करमुक्त करत असल्याची घोषणा केली. त्याआधी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी देखील छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाला त्यांच्या राज्यात करमुक्त घोषित केले आहे.

याआधी महाराष्ट्रात ‘छावा’ चित्रपट करमुक्त करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका मांडली. इतर राज्ये जेव्हा एखादा चित्रपट करमुक्त करतात, तेव्हा तेथील करमणूक कर माफ केला जातो. मात्र, महाराष्ट्र सरकारने 2017 सालीच याबाबत निर्णय घेतला आहे. राज्यात करमणूक कर कायमस्वरूपी रद्द करण्यात आलेला आहे. त्यामुळे अशा प्रकारे करमाफी देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.’

दरम्यान, छावा चित्रपटाने पहिल्याच दिवशी 31 कोटी रुपयांची कमाई केली होती. 6 दिवसात चित्रपटाने 200 कोटी रुपयांचा आकडा गाठला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे. सिनेमात विकीसोबतच रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना यांचीही प्रमुख भूमिका आहे.

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या