Home / आरोग्य / देशात कोरोना संसर्गात वाढ महाराष्ट्रात ५१० सक्रिय रुग्ण

देशात कोरोना संसर्गात वाढ महाराष्ट्रात ५१० सक्रिय रुग्ण

नवी दिल्ली – देशभरात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. सध्या देशात एकूण ४,३०२ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. केरळमध्ये सर्वाधिक...

By: Team Navakal

नवी दिल्ली – देशभरात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. सध्या देशात एकूण ४,३०२ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. केरळमध्ये सर्वाधिक १,३७३, तर महाराष्ट्रात ५१० सक्रिय रुग्ण असल्याची माहिती आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली आहे.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या माहितीनुसार, केरळ मध्ये १३७३ सक्रिय रुग्ण आहेत. महाराष्ट्रात ५१० सक्रिय रुग्ण आढळले आहेत. गुजरातमध्ये कोरोनाचे ४६१, दिल्लीत ४५७ आणि पश्चिम बंगालमध्ये ४३२ सक्रिय रुग्ण , लखनऊमध्ये ४४ सक्रिय रुग्ण सापडले आहेत. जानेवारी २०२५ पासून आतापर्यंत देशात कोरोना संसर्गामुळे ४४ मृत्यू झाले असून त्यापैकी गेल्या पाच दिवसांतच ३७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार राज्यात कोरोनाचे ८६ नवीन रुग्ण आढळले आहेत. यामध्ये मुंबईतील २६, ठाण्यातील ९, नवी मुंबईतील ६, पुण्यातील २७ पिंपरी-चिंचवडमधील ३ , कोल्हापूर २, सांगलीत ५ रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत ४३५ रुग्ण बरे झाले आहेत आणि रुग्णालयातून घरी परतले आहेत. महाराष्ट्रात ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृतांचा आकडा १४ वर पोहोचला आहे.

Web Title:
For more updates: , , , , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या