Home / महाराष्ट्र / प्रगती एक्स्प्रेसचा अधिभार रद्द करण्याची मागणी

प्रगती एक्स्प्रेसचा अधिभार रद्द करण्याची मागणी

पुणे – मुंबई–पुणे प्रगती एक्स्प्रेसचा वेग सुपरफास्टच्या निकषांपेक्षा कमी आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने या गाडीचे वर्गीकरण सामान्य मेल किंवा एक्सप्रेस...

By: Team Navakal

पुणे – मुंबई–पुणे प्रगती एक्स्प्रेसचा वेग सुपरफास्टच्या निकषांपेक्षा कमी आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने या गाडीचे वर्गीकरण सामान्य मेल किंवा एक्सप्रेस गाड्यांमध्ये करून सुपरफास्टचे अतिरिक्त शुल्क रद्द करावे अशी मागणी इशान दाते या प्रवाशाने केली आहे. या मागणीला पाठिंबा मिळत आहे .

१ जून २०२५ पासून लागू करण्यात आलेल्या नवीन वेळापत्रकानुसार १२१२६ पुणे–मुंबई प्रगती एक्सप्रेस पुण्याहून सकाळी ७.४५ वाजता सुटते आणि मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे सकाळी ११.२५ वाजता पोहोचते. म्हणजेच, १८८ किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी या गाडीला ३ तास ४० मिनिटांचा वेळ लागतो. याचा अर्थ गाडीचा सरासरी वेग केवळ ५१ किमी प्रतितास इतका आहे. रेल्वे बोर्डाच्या नियमांनुसार दोन्ही दिशांना सरासरी वेग ५५ किमी प्रतितास किंवा त्याहून अधिक असलेल्या गाड्यांनाच सुपरफास्ट मानले जाते. प्रगती एक्सप्रेसचा वेग या निकषांपेक्षा कमी असल्याने ती सुपरफास्ट श्रेणीत बसत नाही. तरीही पुणे–मुंबई–पुणे प्रगती एक्सप्रेसवर प्रवाशांकडून सुपरफास्ट अधिभार आकारला जात आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने या गाडीचे वर्गीकरण सामान्य मेल किंवा एक्सप्रेस गाड्यांमध्ये करून सुपरफास्ट अधिभार रद्द करावा, अशी प्रवाशांकडून मागणी जोर धरत आहे.

Web Title:
For more updates: , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या