Home / महाराष्ट्र / भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे २२ जूनपासून राज्य अधिवेशन

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे २२ जूनपासून राज्य अधिवेशन

नाशिक – भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे २५वे राज्य अधिवेशन येत्या २२ ते २४ जूनदरम्यान नाशिकच्या बोधलेनगर येथील श्रीकृष्ण लॉन्स येथे पार...

By: Team Navakal

नाशिक – भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे २५वे राज्य अधिवेशन येत्या २२ ते २४ जूनदरम्यान नाशिकच्या बोधलेनगर येथील श्रीकृष्ण लॉन्स येथे पार पडणार आहे. राज्यभरातून या अधिवेशनात सुमारे ४०० प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. यावेळी आगामी तीन वर्षांसाठीचा पक्षाचा कार्यक्रम निश्चित करण्यात येणार असून, नवीन राज्य कौन्सिल व पदाधिकाऱ्यांची निवडही केली जाईल. अधिवेशनस्थळी विविध विचारवंतांची व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत. सायंकाळी इष्टा संस्थेच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २२ जून रोजी ‘भारतीय संविधान : लोकशाहीचा गाभा’ या विषयावर अ‍ॅड. जयंत जायभावे यांचे व्याख्यान होणार असून, अध्यक्षस्थानी संविधान अभ्यासक सुरेश सावंत असतील. अधिवेशनस्थळाला स्वातंत्र्यसैनिक माधवराव गायकवाड नगर, ए. बी. वर्धन विचार मंच आणि जनसत्याग्रही अशी नावे देण्यात आली आहेत. तर प्रवेशद्वारांना सत्यशोधक पुंजा बाबा गोवर्धने, स्वातंत्र्यसैनिक कुसुम गायकवाड आणि फकीरराव डावखर यांच्या नावाने संबोधण्यात आले आहे. अधिवेशनाच्या निमित्ताने एक विशेष स्मरणिकाही प्रकाशित करण्यात येणार आहे.
या अधिवेशनादरम्यान २३ जून रोजी ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते डॉ. भालचंद्र कांगो यांना स्वातंत्र्यसैनिक व माजी आमदार माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या