Home / क्रीडा / मुंबई क्रिकेट संघाचे माजी कर्णधार मिलिंद रेगे यांचे निधन

मुंबई क्रिकेट संघाचे माजी कर्णधार मिलिंद रेगे यांचे निधन

Milind Rege Passed Away : मुंबई क्रिकेट संघाचे माजी कर्णधार मिलिंद रेगे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. काही दिवसांपूर्वीच त्यांनी आपला 76 वा...

By: Team Navakal

Milind Rege Passed Away : मुंबई क्रिकेट संघाचे माजी कर्णधार मिलिंद रेगे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. काही दिवसांपूर्वीच त्यांनी आपला 76 वा वाढदिवस साजरा केला होता.  मिलिंद रेगे यांनी मुंबई क्रिकेटमध्ये अनेक महत्त्वाच्या पदांची जबाबदारी सांभाळली होती.

मिलिंद रेगे यांनी 1966-67 ते 1977-78 या काळात 52 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 126 बळी घेतले. त्याचबरोबर, त्यांनी 23.56 च्या सरासरीने 1532 धावा देखील केल्या. खेळाडू म्हणून कारकीर्द संपल्यानंतर, रेगे विविध भूमिकांमध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) सोबत जोडले गेले.

मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये त्यांनी निवड समिती सदस्य आणि निवड समिती प्रमुख या जबाबदाऱ्या त्यांनी वेगवेगळ्या टप्प्यांवर पार पाडल्या. मिलिंद रेगे हे 1988 मध्ये  तरुण सचिन तेंडुलकरला रणजी ट्रॉफी संघात समाविष्ट करण्यात आलेल्या मुंबईच्या निवड समितीतील एक सदस्य होते.  भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर हे त्यांचे लहानपणीचे मित्र आहेत.

मिलिंद रेगे यांच्या निधनानंतर माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने सोशल मीडियावर पोस्ट करत भावना व्यक्त केली. सोबतच, त्यांच्या योगदानाचीही प्रशंसा केली. सचिन तेंडुलकरने सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले, “मिलिंद रेगे सर यांच्या निधनाची बातमी ऐकून दुःख झाले. ते मुंबई क्रिकेटचे खरे प्रतिनिधी होते, ज्यांनी शहराच्या क्रिकेटमध्ये मोठे योगदान दिले. त्यांनी आणि CCI मधील इतर सदस्यांनी माझ्यातील क्षमता ओळखली आणि मला CCI साठी खेळण्यास सांगितले. आता मागे वळून पाहताना, तो माझ्या कारकिर्दीतील एक ऐतिहासिक क्षण होता.’

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या