Home / महाराष्ट्र / मोदींच्या कार्यकाळात देश कमजोर झाला; संजय राऊतांची टीका

मोदींच्या कार्यकाळात देश कमजोर झाला; संजय राऊतांची टीका

मुंबई – नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीला ११ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर प्रतक्रिया देताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत...

By: Team Navakal


मुंबई – नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीला ११ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर प्रतक्रिया देताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोदींच्या धोरणांवर जोरदार टीका केली. मागील दहा वर्षांत आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला देश अत्यंत कमजोर झाला असल्याचे ही ते म्हणाले.
मोदी सरकारच्या काळात मागील दहा वर्षांत देशाची पार दुर्दशा झाली. गेल्या ७० वर्षांत देश कधी एवढा लाचार झालेला पाहिला नाही. कॅनडा, तुर्किए यांसारख्या छोट्या छोट्या देशांसमोर आपला देश गुढघे टेकू लागला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तर मोदींना पार नमवले. मोदींचे परराष्ट्र धोरण बरबाद झाले. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या मदतीला चीन, अमेरिका, रशिया आणि तुर्किएसारखे देश पुढे सरसावले. पण भारताच्या मागे एकही देश ठामपणे उभा राहिला नाही. हे मोदींच्या परराष्ट्र धोरणाचे अपय़श आहे, असे राऊत म्हणाले.

Web Title:
For more updates: , , , , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या