Home / महाराष्ट्र / लग्नाला नकार दिल्याने लिव्ह-इनमधील प्रेयसीची हत्या

लग्नाला नकार दिल्याने लिव्ह-इनमधील प्रेयसीची हत्या

कोल्हापूर – लग्नास नकार दिल्याच्या कारणावरून लिव्ह-इनमधील प्रेयसीची प्रियकराने चाकूने भोसकून निर्घृण हत्या केली. ही धक्कादायक घटना कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील...

By: Team Navakal

कोल्हापूर – लग्नास नकार दिल्याच्या कारणावरून लिव्ह-इनमधील प्रेयसीची प्रियकराने चाकूने भोसकून निर्घृण हत्या केली. ही धक्कादायक घटना कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील सरनोबतवाडी येथील अमृतनगर परिसरात घडली. तिने लग्नास नकार दिल्याच्या रागातून आरोपी सतीश यादव याने तिच्यावर चाकूने वार करून तिची हत्या केली.

मयत प्रेयसीने २०१९ मध्ये एका तरुणाशी विवाह केला होता. मात्र, मतभेदांमुळे सहा महिन्यांतच ती विभक्त झाली आणि घटस्फोटाचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित होते. या दरम्यान तिने इव्हेंट मॅनेजमेंट व्यवसाय सुरू केला आणि त्यातूनच तिची ओळख सतीशशी झाली. मागील चार महिन्यांपासून ती , तिची मैत्रीण व सतीश हे सरनोबतवाडीत एकत्र फ्लॅटमध्ये राहत होते. सतीश सतत तिच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होता, मात्र तिला लग्न करायचे नव्हते. या कारणावरून त्यांच्यात वारंवार वाद होत होते. त्यानंतर त्यांना फ्लॅटचे भाडे परवडत नसल्याने त्यांनी काही दिवसांपूर्वी फ्लॅट सोडण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यांचे सामान फ्लॅटमध्येच राहिले होते. चार दिवसांनंतर तू आणि मैत्रीण सामान घेण्यासाठी फ्लॅटवर गेली असता सतीश तिथे पोहोचला आणि त्याचा तिच्याशी वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यावर त्याने तिच्या छातीत चाकू खुपसला आणि फ्लॅटला बाहेरून कडी लावून पसार झाला . मैत्रिणीने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण ती काही करू शकली नाही. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. गांधीनगर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून आरोपी सतीशच्या शोधासाठी पाच विशेष पथके तैनात केली आहेत.

Web Title:
For more updates: , , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या