Home / महाराष्ट्र / सोलापुरात गर्भवती विवाहितेची हुंड्याकरिता छळामुळे आत्महत्या

सोलापुरात गर्भवती विवाहितेची हुंड्याकरिता छळामुळे आत्महत्या

सोलापूर–सोलापूर जिल्ह्यात तीन महिन्यांची गर्भवती असलेल्या आशाराणी भोसले या विवाहितेने सासरी हुंड्यासाठी होणाऱ्या छळामुळे गळफास घेऊन आत्महत्या केली. पुण्यातील वैष्णवी...

By: Team Navakal

सोलापूर–सोलापूर जिल्ह्यात तीन महिन्यांची गर्भवती असलेल्या आशाराणी भोसले या विवाहितेने सासरी हुंड्यासाठी होणाऱ्या छळामुळे गळफास घेऊन आत्महत्या केली. पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण ताजे असतांनाच दुसरी घटना घडल्याने महाराष्ट्र हादरला आहे.
याप्रकरणी तिचे वडील नागराज डोणे यांनी तिचा पती पवन भोसले, सासू अलका भोसले आणि सासरे बलभीम भोसले यांच्या विरोधात तक्रार नोंदवून गुन्हा दाखल केला. या तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तिला तीन वर्षांची चिमुकली मुलगी आहे आणि मृत्यूवेळीही ती तीन महिन्यांची गर्भवती होती.
या तक्रारीनुसार मोहोळ तालुक्यातील चिंचोलीकाटी या गावात मागील तीन वर्षांपासून आशाराणीला पती पवन हा चारचाकी वाहन खरेदी करण्यासाठी आणि खर्चासाठी माहेरहून पैसे आण म्हणून मारहाण करत होता. सासू अलका भोसले आणि सासरा बलभीम भोसले हे स्वयंपाक नीट करता येत नाही, मुलाला इज्जत देत नाही असे म्हणत मानसिक छळ करत होते.
तिच्या कुटुंबाने सांगितले की, २०१९ मध्ये मोठी मुलगी उषाराणी भोसलेचा विवाह ज्ञानेश्वर भोसलेसोबत झाला. त्यानंतर त्याचा लहान भाऊ पवनने धाकटी मुलगी आशाराणीला पळवून नेऊन प्रेमाविवाह केला. परंतु मुलगी झाल्यापासून तिचा छळ सुरू होता. अनेक वेळा तिच्या कुटुंबाला व्हिडीओ कॉल करत आशाराणीला मारहाण केली जात होती. २०२४ मध्ये तिच्या पतीने तिला मारहाण करून माहेरी पाठवले होते. त्यानंतर पवनने ती नांदायला येत नाही म्हणून पोलिसांकडे तक्रार दिली. त्यावेळी महिला तक्रार निवारण केंद्राच्या मदतीने पती-पत्नीचे समुपदेशन झाले होते. मात्र त्यानंतरही त्रास सुरूच होता. मला सहन करणे अशक्य झाले आहे असा माहेरी निरोप देऊन तिने आत्महत्या केली .

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या