Diwali Bonus – राज्यातील अंगणवाडी सेविका (Anganwadi workers) व मदतनीस यांची दिवाळी गोड होणार आहे. त्यांना राज्य सरकारने बोनस जाहीर केला आहे. त्यांना दिवाळी निमित्त दोन हजार रुपये भाऊबीज (Bhau Beej gift) म्हणून भेट दिली जाणार आहे,अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे (Minister Aditi Tatkare) यांनी दिली आहे.
मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत (ICDS) कार्यरत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना भाऊबीज भेट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.यासाठी एकूण ४०.६१ कोटींचा निधी उपलब्ध केला आहे.त्यामुळे अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना मोठा दिलासा मिळणार आहे.
अंगणवाडी ताईंना "भाऊबीज भेट" !
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) September 26, 2025
महाराष्ट्रातील बालकांच्या पोषणासाठी, महिलांच्या आरोग्यासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजना यशस्वीरीत्या अंमलात आणण्यासाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस अतिशय समर्पित भावनेने सेवा देतात. या निस्सीम सेवेप्रती आदर व्यक्त करत दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सर्व… pic.twitter.com/DxkY6foNeR
अंगणवाडी सेविका व मदतनीस या महिला व बालकांच्या संगोपनासाठी, पोषणासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी महत्वाची सेवा बजावत आहेत. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी ही भाऊबीजेची रक्कम भेट स्वरूपात मंजूर केली आहे. प्रत्येक अंगणवाडी सेविका व मदतनीस ही आपल्या समाजातील खरी शक्ती आहे.
हे देखील वाचा –
मुंबईत कबुतरखान्यांसाठी जागा शोधण्याचे काम सुरू ! १३ ठिकाणे निश्चित केली
गावित भगिनींची संचित रजा नामंजूर; उच्च न्यायालयानेही मागणी फेटाळली