Home / महाराष्ट्र / Advertisement complaint : टीव्ही कार्यक्रमात जाहिरातींची अडचण?पुण्यातील आजीबाईंची सुप्रिया सुळेंकडे तक्रार….

Advertisement complaint : टीव्ही कार्यक्रमात जाहिरातींची अडचण?पुण्यातील आजीबाईंची सुप्रिया सुळेंकडे तक्रार….

Advertisement complaint – राजकारणी बऱ्याचदा गाव-शहरात दौऱ्यावर असतात, तिथले स्थानिक रहिवासी (local residents)सुद्धा त्यांच्या समोर आपल्या समस्या मांडताना आपण बऱ्याचदा...

By: Team Navakal
Advertisement complaint

Advertisement complaint – राजकारणी बऱ्याचदा गाव-शहरात दौऱ्यावर असतात, तिथले स्थानिक रहिवासी (local residents)सुद्धा त्यांच्या समोर आपल्या समस्या मांडताना आपण बऱ्याचदा पाहतो. अगदी वीजे पासून ते पाण्याच्या समस्यांपर्यंतचा सगळयांवर तोडगा काढण्यासाठी जनता राजकारण्यांकडे (Politician) धाव घेते. पण, एक आगळी-वेगळी समस्या पुण्यातल्या (Pune) एका वृद्ध महिलेनं (Old Lady) थेट खासदारांकडे मांडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बारामतीच्या खासदार सुप्रीया सुळे यांच्याकडे या आजीबाईने एक अनोखी तक्रार केली आहे. अनेक समाजमाध्यमांवर हा व्हिडीओ चांगलाच वायरल होताना सुद्धा दिसत आहे.

आजीबाई सुप्रीया सुळेंना म्हणाल्या की, माझी एक तक्रार आहे, आम्ही म्हातारी माणसं घरी टीव्ही बघतो. एवढे पैसे भरून आम्ही जाहिरातीच पाहत बसायच्या का? काय बघायचं सांगा? दहा मिनिटांचा कार्यक्रम असतो. बाकीची वीस मिनिटं जाहिरातीच. एक जाहिरात तर दोन दोन वेळा दाखवतात..कुठे तक्रार करु हेच मला समजेना…”
“योगायोगाने तुम्ही आलात, त्यामुळे मला जरा बरं वाटलं, त्याच्यावर तुम्हाला काहीतरी करता आलं तर बघा. थोडी मेहरबानी होईल. कारण आमचा वेळ जात नाही. नुसता वैताग आणला आहे. सुप्रीया सुळेंनी देखील आजीबाईंची तक्रार ऐकून घेतली आणि तुमच्या मागणीचा विचार नक्की करते, असं आश्वासनही आजीबाईंना दिल आहे. आजीबाईंच्या तक्रारीचा निराकरण होणार का हे पाहून आता औत्सुक्याचं ठरणार आहे.


हे देखील वाचा –

 दिवाळीनिमित्त टाटाची ‘नेक्सॉन’वर खास ऑफर; खरेदीवर होईल लाखो रुपयांपर्यंतची बचत; पाहा डिटेल्स

Web Title:
संबंधित बातम्या