Adani – नव्याने सुरू केलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून कालपासून विमानांचे उड्डाण व आगमन सुरू झाले. याचे स्वागत होत असतानाच या विमानतळावर उभ्या असलेल्या एका विमानाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. या विमानावर ‘अदानी’ (Adani) हे शब्द स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे अदानी समूहाची विमान कंपनीही सुरू झाली का? असा सवाल विचारला जात आहे.
अदानी लिहिलेले हे विमान गौतम अदानी यांचे खासगी विमान आहे की, हे अदानी कंपनीचे प्रवासी वाहतूक विमान आहे? हा प्रश्न सर्वांना पडला आहे. काही दिवसांपूर्वी वैमानिकांसाठी नवे नियम लागू झाल्यानंतर इंडिगो विमानांची सेवा पूर्ण ढासळली आणि यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले.
इंडिगो कंपनीची मोठी बदनामी झाली. भारतात प्रवासी सेवेत आघाडीवर असलेली आणि वेळेत विमान नेणारी कंपनी म्हणून ख्याती मिळवलेल्या या कंपनीने इतका गोंधळ का घातला असेल अशी चर्चा सुरू होती. त्याचवेळी नेमके अदानी समूहाने वैमानिकांना प्रशिक्षण देणारी कंपनी विकत घेतली. यातूनच अदानी विमान कंपनी सुरू करणार अशी चर्चा सुरू झाली. या पार्श्वभूमीवर नवी मुंबई विमानतळावर अदानी लिहिलेले विमान दिसल्याने चर्चेला उधाण आले आहे.
शरद पवारांच्या विद्या विकास कार्यक्रमाला अदानी प्रमुख पाहुणे
पुणे- उद्योगपती गौतम अदानी, शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे सर्व ऐन निवडणुकीच्या धामधुमीत एका विशेष कार्यक्रमानिमित्त रविवारी एकाच मंचावर दिसणार आहेत. बारामती येथे शरद पवार कुटुंबाच्या विद्या प्रतिष्ठानच्या आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या नवीन वास्तूचे उद्घाटन अदानी ग्रुपचे अध्यक्ष व संस्थापक गौतम अदानी यांच्या हस्ते केले जाणार आहे. अदानी विरोधात काँग्रेस रान
पेटवत आहे, अदानीच्या उत्कर्षाबाबत अनेकजण संशय घेत आहेत. तरीही शरद पवार त्यांना सतत भेटतात. आता तर त्यांच्या घरच्या संस्थेच्या कार्यक्रमाला त्यांनी अदानी यांनाच प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले आहेरविवार 28 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता विद्या प्रतिष्ठानचे संस्थापक व अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ होणार आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खा. सुप्रिया सुळे, खा. सुनेत्रा पवार यांचीही उपस्थिती असणार आहे.सध्या महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असतानाच पवार कुटुंब समारंभानिमित्त मंचावर एकत्र दिसणार आहे.
—————————————————————————————————————————————————–
हे देखील वाचा-
नांदेडमध्ये चार जणांचा रहस्यमय मृत्यू; नांदेडमधील धक्कादायक घटना









