Home / महाराष्ट्र / माळीण दुर्घटनाग्रस्त कुटुंबांच्यापुनर्वसनसाठी ५१ लाखांचा निधी ! मंत्री गणेश नाईकांची माहिती

माळीण दुर्घटनाग्रस्त कुटुंबांच्यापुनर्वसनसाठी ५१ लाखांचा निधी ! मंत्री गणेश नाईकांची माहिती

मुंबई – पुणे जिल्ह्यातील माळीण (Malin village)दुर्घटनाग्रस्त कुटुंबांच्या पुनर्वसनसाठी आता पर्यंत ५१.७२ लाख निधी वितरित (disbursed)केला आहे अशी माहित वन...

By: Team Navakal
Minister Ganesh Naik

मुंबई – पुणे जिल्ह्यातील माळीण (Malin village)दुर्घटनाग्रस्त कुटुंबांच्या पुनर्वसनसाठी आता पर्यंत ५१.७२ लाख निधी वितरित (disbursed)केला आहे अशी माहित वन मंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेतील तारांकित प्रश्नोत्तरांत (questions) दिली.
माळीण गावात जुलै २०१४ मध्ये झालेल्या दुर्घटनेत वाचलेल्या २० कुटुंबांचे पुनर्वसन केलेल्या गावातील घरांमध्ये वीज, शाळा, वहिवाटीकरिता रस्ता, रोजगार व अन्य कोणत्याही सुविधा उपलब्ध नसल्याने सदर कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे,असा दावा करून सरकारने या लोकांचे सर्व सोयी-सुविधांयुक्त कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याबाबत भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजय देशमुख यांच्यासह इतर आमदारांनी केली होती.

यावर गणेश नाईक (Minister Ganesh Naik)यांनी उत्तर दिले की मदत व पुनर्वसन उप विभागाच्या शासन निर्णयान्वये त्या ठिकाणी २० निवारा शेड आणि दोन स्वच्छतागृह उभारण्यासाठी ४३.८२ लाखांचा निधी वितरित केला होता. २० कुटुंबीयांच्या तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आलेल्या जागेचे भाडे, वीजबिल आणि घरपट्टी भरण्यासाठी ७.९० लाखांची रक्कम ही मुरबाड वन विभागाकडे दिली आहे.

Web Title:
संबंधित बातम्या