Home / महाराष्ट्र / बीडमध्ये गुन्हेगारांचे छायाचित्र लावल्यास गुन्हा दाखल होणार

बीडमध्ये गुन्हेगारांचे छायाचित्र लावल्यास गुन्हा दाखल होणार

बीड – बीडमध्ये (Beed) होर्डिंगवर गुन्हेगारांचे छायाचित्र लावल्यास गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन (Vivek Johnson)यांनी दिले आहेत. अलीकडेच...

By: Team Navakal
Case registered if the photo of the criminal is posted in Beed

बीड – बीडमध्ये (Beed) होर्डिंगवर गुन्हेगारांचे छायाचित्र लावल्यास गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन (Vivek Johnson)यांनी दिले आहेत. अलीकडेच शहरात आणि तालुक्यांत अनेक ठिकाणी गुन्हेगारांचे छायाचित्र असलेले बॅनर (Banner) लावण्यात आले होते, ज्यावरून विरोधकांनी सरकारवर (Government) टीका केली होती.


मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडचे फोटो परळी आणि बीडमध्ये झळकले होते. तसेच सरपंच बापू आंधळे (Bapu Andhale) यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी बबन गित्तेचा वाढदिवस साजरा करण्यासाठी बॅनरवर फोटो लावण्यात आला होता. या संदर्भात संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी अशा होर्डिंगवर कारवाई करण्याची मागणी केली होती.


या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हा प्रशासनाने आता स्पष्ट निर्देश दिले आहेत की, अनधिकृत होर्डिंग आढळल्यास नगरपरिषद किंवा पालिकेकडून तत्काळ कारवाई केली जाईल. तसेच कोणतेही होर्डिंग लावण्यापूर्वी मजकूर आणि फोटोची पडताळणी करणे बंधनकारक राहील.

Web Title:
संबंधित बातम्या