जळगाव – जळगावात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात स्वीय सहायक असल्याचे सांगून हितेश रमेश संघवी (Hitesh Ramesh Sanghvi)व त्याची पत्नी अर्पिता संघवी या जोडप्याने तब्बल २० जणांची फसवणूक केली. या प्रकरणी जळगावातील शनिपेठ पोलीस ठाण्यात दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
शहरातील जुने गावातील विठ्ठल पेठेत राहणारे हर्षल शालीग्राम बारी (Harshal Shaligram Bari)यांच्यासह १९ जणांची फसवणूक झाली आहे. या जोडप्याने हर्षल यांच्याकडून २३ नोव्हेंबर २०२४ ते ८ ऑगस्ट २०२५ या आठ महिन्यात एकूण ५५ लाख ६० हजार रुपये लुबाडले. आरोपी हितेश संघवी व अर्पिता संघवी या जोडप्याने तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात स्वीय सहाय्यक असल्याचे सांगून बनावट ओळखपत्र (fake ID cards), बनावट लेटरपॅड आणि अपॉइंटमेंट लेटर (appointment letters)दाखवून सर्वांचा विश्वास संपादन केला.
रेल्वेत चांगल्या पदावर नोकरी (jobs in the railways)मिळवून देणे आणि टेंडर (tenders) मंजूर करून देण्याचे आमिष दाखवत त्यांनी अनेकांकडून पैसे घेतले. पण कोणतेही काम न झाल्याने पीडितांनी वारंवार संपर्क (contact)साधण्याचा प्रयत्न केला, पण आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे देत नंतर मोबाईल बंद केले. फसवणुकीची बाब उघड झाल्यानंतर पीडितांनी (victims) पोलीस अधीक्षकांची भेट घेत तक्रार केली. हा तपास सध्या आर्थिक गुन्हे शाखेकडे (crime branch) वर्ग करण्यात आला आहे.