Aandacha Shidha: राज्यातील सर्वसामान्य जनतेला सणासुदीच्या काळात दिलासा मिळावा यासाठी महायुती (Mahyuti) सरकारने सुरु केलेली आणखी एक योजना आता बंद होणार अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच रंगताना दिसत आहे. गणेशोत्सवापाठोपाठ यंदाच्या दिवाळीत आनंदाचा शिधा (Aandacha shidha) मिळणार नसल्याचे संकेत वर्तवले जात आहेत. गोरगरिबांना सण साजरे करता यावे यासाठी हि योजना सरकारने सुरु केली होती.
या योजनेतंर्गत दिवाळी आणि इतर सणांच्या काळात राशनच्या दुकानांवर धान्य वितरित केले जायचे. मात्र, यंदा राज्य सरकारकडून (Maharashtra GOVT) गणेशोत्सव आणि त्यानंतर दिवाळीत आनंदाचा शिधा वितरित करण्यात आलेला नाही. त्यामुळे ही योजनाही बंद होणार का असे वारे सध्या राज्याच्या राजकारणात वाहताना दिसत आहेत.. या योजनेच्या पार्शवभूमीवर अनेक विरोधी पक्ष नेत्यांनी सरकारवर टीकास्त्र केले आहे.. या योजनेअंतर्गत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी देखील सरकारला खडे बोल सुनावले आहेत. ते म्हणतात “निवडणुका सरो..मतदार मरो’ या तत्वाने काम करणाऱ्या देवा भाऊ सरकारने आता आनंदाचा शिधा योजनेवर देखील गदा आणली आहे. योजनेला निधी उपलब्ध न करून अप्रत्यक्षपणे योजनाच बंद करण्याचा नवा फॉर्म्युला या सरकारने आणला असून आनंदाचा शिधा योजनेबत देखील तेच होताना दिसत आहे… गणपती नंतर दिवाळीत देखील आनंदाचा शिधा मिळणार नसल्याचं समोर येत आहे…..निधी नाही म्हणून की शिंदे साहेबांनी आणलेली योजना म्हणून ही योजना बंद केली जातेय हा संशोधनाचा विषय असला तरी २० लाखांची गादी–सोफा वापरणारे अलिशान सरकार आनंदाचा शिधा योजनेसाठी निधी देऊ शकत नसेल तर मग या सरकारला काय म्हणावे? ‘असे म्हणत त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सरकारची चांगलीच कानउघाडणी केली आहे.
रोहित पवारांनपाठोपाठच (Rohit Pawar) छगन भुजबळांनी (Chagan bhujbal) देखील यावर प्रतिकिया दिली आहे. सरकारची लाडकी बहीण योजना ह्या सगळ्यात मोठ्या योजनेचा फटका या योजनांना बसत असल्याचं ठोस वक्तव्य देखील त्यांनी या वेळी माध्यमांशी बोलताना दिल.
हे देखील वाचा –