Home / महाराष्ट्र / अखेर आरती साठेंसह तिघांची उच्च न्यायालयात नियुक्ती

अखेर आरती साठेंसह तिघांची उच्च न्यायालयात नियुक्ती

Aarti Sathe appointed to the High Court

मुंबई – भाजपाच्या (BJP) माजी प्रदेश प्रवक्त्या आणि अधिवक्ता आरती अरुण साठे (Aarti Sathe) यांच्यासह ज्येष्ठ वकील सुशील मनोहर घोडेस्वार (Ad. Khodeswar) आणि अजित कडेठाणकर (Ajit Kadethankar) या तिघांची उच्च न्यायालया(High Court)च्या अतिरिक्त न्यायाधीश (Additional Judge) पदी नियुक्ती करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालया(Supreme Court)च्या कॉलेजियमने आरती साठे यांची १५ दिवसांपूर्वी या नियुक्तीसाठी शिफारस केली होती. त्याला अनेकांनी विरोध केला. मात्र अखेर काल आरती साठे यांच्यासह तिघांची न्यायाधीशपदी नियुक्ती झाली आहे. केंद्र सरकारने काल त्यासंदर्भातील अधिसूचना जारी केली.

अतिरिक्त न्यायाधीशांची नियुक्ती दोन वर्षांसाठी असते व त्यांना नंतर कायम केले जाते.साठे या भाजपाशी संबंधित असल्याने ते यांच्या नियुक्तीस काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यासह अन्य विरोधी पक्षांनी आक्षेप घेवून भारताचे सरन्यायाधीश भूषण गवईंना हस्तक्षेप करण्याची विनंती केली होती. मुंबई उच्च न्यायालयात कार्यरत तीन वकिलांची उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्याचा प्रस्ताव काही काळापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय, न्या.नितीन जामदार आणि न्या.के.आर. श्रीराम यांच्या न्यायवृंदाने २८ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाकडे पाठवला होता.मात्र शिफारशींच्या या प्रस्तावावर काहीच निर्णय घेण्यात आला नव्हता. अखेर केंद्र सरकारने काल या तिघांच्या नियुक्तीची अधिसूचना जारी केली. आता या तिघांच्या नियुक्तीमुळे मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची संख्या ६९ इतकी झाली आहे.