Home / महाराष्ट्र / Railway accident: रेल्वे कर्मचारी आंदोलनानंतर अपघात !फास्ट लोकलने प्रवाशांना उडवले! तीन ठार

Railway accident: रेल्वे कर्मचारी आंदोलनानंतर अपघात !फास्ट लोकलने प्रवाशांना उडवले! तीन ठार

Railway accident- मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणात दोन रेल्वे अभियंत्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यास तीव्र विरोध करत रेल्वे कर्मचार्‍यांनी आज संध्याकाळी छत्रपती...

By: Team Navakal
railway accident
Social + WhatsApp CTA

Railway accident- मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणात दोन रेल्वे अभियंत्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यास तीव्र विरोध करत रेल्वे कर्मचार्‍यांनी आज संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर आंदोलन केले. त्यामुळे तासभर मध्य रेल्वेची लोकल सेवा बंद होती. ऐन गर्दीच्या वेळी लोकल बंद राहिल्याने काही प्रवासी ट्रॅकवर उतरले. त्याच वेळी सुरू झालेल्या लोकलखाली (Railway accident)येऊन यातील तीन प्रवाशांचा मृत्यू झाला. तर एक प्रवासी जखमी झाला. मुंब्रा येथील अपघाताच्या संदर्भातील आंदोलनानंतर पुन्हा अशी हृदयद्रावक घटना घडल्याने प्रवाशांत संतापाचे वातावरण आहे. रेल्वेेने मात्र अधिकृतरित्या दोन प्रवासी ठार झाल्याची माहिती दिली.


9 जून रोजी मुंब्रा स्थानकाजवळ झालेल्या अपघातात लोकलमधून पडून पाच जणांचा मृत्यू झाला होता, तर नऊ जण जखमी झाले होते. रेल्वे पोलिसांच्या अहवालात अपघातासाठी वरिष्ठ सेक्शन अभियंता आणि सहायक विभागीय विद्युत अभियंता यांना जबाबदार धरण्यात येऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. पोलिसांचा हा आरोप अन्यायकारक आणि निराधार असून, या दुर्घटनेशी रेल्वे कर्मचार्‍यांचा काही सहभाग नसल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. यावरून रेल्वे संघटनांनी, मध्य रेल्वे मजदूर संघाने आज सायंकाळी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील विभागीय रेल्वे व्यवस्थापकांच्या कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र त्यांची माहिती बर्‍याचशा प्रवाशांना नव्हती.


 संध्याकाळी पाच वाजता कर्मचार्‍यांनी काम बंद करून आंदोलनाला सुरुवात केली. कर्मचार्‍यांनी घोषणाबाजी करत ठिय्या दिला. मोटरमनही या आंदोलनात सहभागी झाले.  त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून एकही गाडी सुटली नाही. जवळजवळ तासभर लोकल सेवा बंद होती. त्यामुळे संध्याकाळी कामावरून घरी जाणार्‍यांचे हाल झाले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह सगळ्याच स्थानकांवर प्रवाशांची गर्दी उसळली. संध्याकाळी साडेसहा वाजता अभियंत्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्निल लीला यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे प्रशासनाने तातडीने रेल्वे युनियनसोबत बोलणी सुरू केली. लोकल सेवा त्वरित पूर्ववत व्हावी, यासाठी डीआरएम आणि अन्य वरिष्ठ अधिकार्‍यांनी आंदोलकांशी चर्चा केली. आंदोलकांसोबत यशस्वी बोलणी झाल्यानंतर सुमारे पावणेसात वाजता लोकल सेवा पुन्हा सुरू करण्यात आली.


 तोपर्यंत प्रत्येक स्थानकावर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी उसळली होती. अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर वाहतूक विस्कळीत झाली होती. लोकल सेवा तीस-ते चाळीस मिनिटे उशिरा धावत होती. त्यामुळे प्रवाशांना लोकलमध्ये चढता येत नव्हते. प्रवासी अर्धा ते एक तास स्थानकांवर लोकलची वाट पाहत राहिले. त्यामुळे काही प्रवाशांनी रेल्वे रुळावर उतरून पायी जाणे पसंत केले. काही प्रवासी सँडहर्स्ट रोड स्थानकाजवळ रुळावरून चालत होते. त्याचवेळी हे आंदोलन मागे घेतल्यानंतर सुटलेल्या अंबरनाथ जलद लोकलने रुळावर 4 प्रवाशांना उडवल्याने एकच गोंधळ उडाला. त्यातील 3 जणांचा मृत्यू झाला, तर एक प्रवासी जखमी झाला. जखमी प्रवाशाचा खांदा निखळला असून, त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे, त्याची प्रकृती स्थिर असल्याचे जेजे रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले. एका मृत प्रवाशाचे नाव हेली मोहमाया (19) असून इतरांची ओळख पटलेली नाही.


या अपघाताची माहिती मिळताच प्रवाशांनी संताप व्यक्त केला. रेल्वे प्रशासनाने वेळीच तोडगा काढला असता तर प्रवाशांचे जीव वाचले असते. काल कर्मचार्‍यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतरही प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. आंदोलन झाल्यास काय होऊ शकते याची कल्पना रेल्वे प्रशासनाला नव्हती का? अशी प्रतिक्रिया प्रवाशांनी दिली.

——————————————————————————————————————————————————

हे देखील वाचा –

महादेव बेटिंग अ‍ॅप घोटाळ्यातील प्रमुख आरोपी दुबईहून बेपत्ता

सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीकडून झटका..

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या