Accident Case : यवतमाळ जिल्ह्यातील वणी घुग्गुस मार्गावर एक अत्यंत दुर्दैवी अपघाताची घटना घडली. यात कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू झाला आहे. हि धडकेत जन्नत सेलिब्रेशन हॉलपासून काही अंतरावर झाली असल्याची माहिती आहे. मुलीला कार शिकवताना हा दुर्देवी अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या अधिकच्या माहितीनुसार, वणीतील लालपुलिया परिसरात राहणारे रियाज शेख हे व्यावसायिक ट्रक दुरूस्तीचे काम करत होते. त्यांचे स्वत:चे गॅरेज असल्याची माहिती आहे. ते आपल्या मुलीला कार चालवायला शिकवत होते. कार शिकवण्यासाठी ते आपल्या मुलीला घुग्गुस मार्गावर घेऊन गेले. दरम्यान, जन्नत हॉलजवळ मुलीचे कारवरचे नियंत्रण सुटले. तिनं ब्रेकऐवजी एक्सीलेटर जोरात दाबला.
कार थेट दुभाजकावरून उसळून महामार्गाच्या थेट विरूद्ध दिशेनं गेली. तसेच समोरून येणाऱ्या ट्रकला जाऊन धडकली. कारचा समोरील भाग चक्काचूर झाल्याची दृश्य आहेत.
या भीषण अपघातात कारमधील एकूण ४ मुलींनचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर, रियाज यांचा रूग्णालयात उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये रियाज यांच्या भावाच्या मुलाचाही समावेश असल्याची माहिती आहे. मिळालेल्या अधिकच्या माहितीनुसार, मायरा शेख (वय वर्ष १७), अनिबा (वय वर्ष ११), झोया (वय वर्ष १३), लियाबा आणि रियाज (वय वर्ष ५४) अशी मृतकांची नावे आहेत. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली गेली. या घटनेनंतर काही काळ वाहतूक कोंडी देखील झाली होती. पोलिसांनीही घटनास्थळी तात्काळ धाव घेतली.
हे देखील वाचा –
Leopard Siren : जुन्नरमध्ये बिबट्या दिसताच आपोआप वाजणार सायरन
 
								 
								 
								 
								 
								 
				 
															 
								 
								 
								 
								 
								 
								








