Home / मनोरंजन / Actor Atul Kulkarni – अंधश्रद्धेवर थेट प्रहार; भक्त कोण? अतुल कुलकर्णींची पोस्ट चर्चेत

Actor Atul Kulkarni – अंधश्रद्धेवर थेट प्रहार; भक्त कोण? अतुल कुलकर्णींची पोस्ट चर्चेत

Actor Atul Kulkarni – नाशिकमधील भोंदूबाबा ‘कॅप्टन’ अशोक खरात प्रकरणानंतर राज्यभरात खळबळ उडाली असताना अभिनेते अतुल कुलकर्णी (Atul Kulkarni) यांनी...

By: Team Navakal
Actor Atul Kulkarni
Social + WhatsApp CTA

Actor Atul Kulkarni – नाशिकमधील भोंदूबाबा ‘कॅप्टन’ अशोक खरात प्रकरणानंतर राज्यभरात खळबळ उडाली असताना अभिनेते अतुल कुलकर्णी (Atul Kulkarni) यांनी समाजाच्या मानसिकतेवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “एखादा बाबा पकडला गेला की तरच तो भोंदू ठरतो का?” (fake) असा सवाल करत त्यांनी अंधश्रद्धा (Superstition), व्यक्तीपूजा (Personality Cult) आणि आंधळ्या भक्तीवर (Blind Faith) बोचरी टीका केली.

\अतुल कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर (Social Media Post) लिहिले, पकडले गेले कीच आणि तरच ‘भोंदू’? त्या आधी ते काय असतात ? आणि जे कधी पकडलेच जात नाहीत ते? ज्या वेळी कुणी ‘महाराज’ भाोंदू ‘निघतात’, तेंव्हा त्यांचे भक्तं नेमके कोण होतात-भागीदार, पिडीत, अंधळे, अंधश्रद्धाळू, कमनशिबी, भाबडे, मूर्ख की आणखी कुणी? श्रद्धा, अंध कधी होते? डोळस श्रद्धा म्हणजे काय? डोळस आणि अंध श्रद्धां मधे अंतर किती असतं? अंध होण्याला कारणीभूत कोण असतं? करणारे की होणारे ? अंधळं होणाऱ्यांवर त्याची काही जबाबदारी असते की नसते? हे सगळं जितकं धर्मकारणाला लागू होतं (कुठल्याही धर्माच्या) तितकंच ते राजकारणालाही लागू होतं का (कुठल्याही पक्षाच्या) ?

https://www.instagram.com/p/DWLPARNCNwb

भक्तांची भूमिका काय?

कुलकर्णी पुढे म्हणतात, “जेव्हा कुणी ‘महाराज’ भोंदू निघतात, तेव्हा त्यांचे भक्त नेमके कोण असतात – भागीदार (Partners), पीडित (Victims), अंधश्रद्धाळू (Blind Believers) की भाबडे (Naive)? त्यांनी श्रद्धा (Faith) आणि अंधश्रद्धा (Blind Faith) यामधील सीमारेषाही अधोरेखित केली. डोळस श्रद्धा (Rational Faith) म्हणजे काय? अंध आणि डोळस श्रद्धेमध्ये अंतर किती?” असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.

जबाबदारी कोणाची?
अंध होण्याला कारणीभूत कोण – करणारे की होणारे? अंधळं होणाऱ्यांवर काही जबाबदारी असते का?” असा सवाल करत त्यांनी समाजालाच आत्मपरीक्षण (Self-Introspection) करण्याचे आवाहन केले.

धर्मासोबत राजकारणावरही प्रश्न
कुलकर्णी यांनी पुढे म्हटले की, “हे सगळं जितकं धर्मकारणाला (Religious Context) लागू होतं, तितकंच ते राजकारणालाही (Political Context) लागू होतं का? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी व्यापक सामाजिक चर्चेला (Public Debate) सुरुवात केली आहे.


हे देखील वाचा –

मस्साजोग सरपंच पदासाठी पोटनिवडणूक जाहीर; 28 एप्रिलला मतदान

साताऱ्यात सत्तासंघर्ष – अधिकाऱ्यांना घरगड्यासारखी वागणूक गोरेंचा देसाईंवर आरोप

मथुरेत ‘फरसा वाले बाबा’ यांचा अपघाती मृत्यू ; महामार्गावर रस्ता रोको- १३ जण अटकेत

Web Title:
संबंधित बातम्या