Home / महाराष्ट्र / ACC Limited of Gautam Adani Group: अदानींच्या कंपनीला आयकर खात्याकडून २३ कोटींचा दंड

ACC Limited of Gautam Adani Group: अदानींच्या कंपनीला आयकर खात्याकडून २३ कोटींचा दंड

ACC Limited of Gautam Adani Group: अदानींच्या कंपनीला आयकर खात्याकडून २३ कोटींचा दंडगौतम अदानी समूहातील एसीसी लिमिटेड या कंपनीवर (ACC...

By: Team Navakal
ACC Limited of Gautam Adani Group

ACC Limited of Gautam Adani Group: अदानींच्या कंपनीला आयकर खात्याकडून २३ कोटींचा दंडगौतम अदानी समूहातील एसीसी लिमिटेड या कंपनीवर (ACC Limited of Gautam Adani Group) अदानींच्या कंपनीला आयकर खात्याकडून २३ कोटींचा दंडआयकर विभागाने २३.०७ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. २०१५-१६ या आर्थिक वर्षात उत्पन्नाची चुकीची माहिती सादर केल्याप्रकरणी १४.२२ कोटींचा तर २०१८-१९ या आर्थिक वर्षात दिलेल्या चुकीच्या माहितीसाठी ८.८५ कोटींचा दंड लावण्यात आला आहे.

अदानी समूहाने या कारवाईला आव्हान देण्याचा निर्णय घेतला असून एसीसी लिमिटेडने शेअर बाजाराला दिलेल्या सूचनेत सांगितले की, कंपनी आयकर आयुक्तांकडे अपील दाखल करणार आहे. तसेच या आदेशांना स्थगिती मिळावी, अशीही मागणी करणार आहे. कंपनीला ही नोटीस १ ऑक्टोबर २०२५ रोजी मिळाली असून या दंडामुळे कंपनीच्या दैनंदिन कामकाजावर कोणताही परिणाम होणार नाही, असे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

एसीसी लिमिटेड ही अंबुजा सिमेंट्सची उपकंपनी असून अंबुजाकडे एसीसीमधील ५० टक्के शेअर आहेत. अदानी समूहाने सप्टेंबर २०२२ मध्ये स्वित्झर्लंडच्या होल्सिम समूहासोबत ६.४ अब्ज अमेरिकी डॉलरचा व्यवहार करून अंबुजा सिमेंट्स आणि तिची उपकंपनी एसीसी लिमिटेडचे अधिग्रहण केले होते.


हे देखील वाचा

\व्यक्तिमत्व हक्क प्रकरणात आशा भोसले यांना दिलासा

मीराबाई चानूचे वर्ल्ड वेटलिफ्टिंगमध्ये दमदार पुनरागमन! 199KG वजन उचलत जिंकले रौप्य पदक

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या