Home / महाराष्ट्र / Onions : दिवाळीत ग्राहकांना स्वस्त कांदा मिळणार

Onions : दिवाळीत ग्राहकांना स्वस्त कांदा मिळणार

Onions – अतिवृष्टी (Heavy rain)आणि पुरामुळे (Floods)खरीप हंगामातील कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र आता कांदा चाळीतील (warehouses) कांदा...

By: Team Navakal
Onions

Onions – अतिवृष्टी (Heavy rain)आणि पुरामुळे (Floods)खरीप हंगामातील कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र आता कांदा चाळीतील (warehouses) कांदा उपलब्ध होणार आहे. कांद्याची निर्यात ठप्प झाल्याने कांद्याच्या चाळीमध्ये साठवण केलेला कांदा बाजारात येणार आहे.

हा कांदा आल्यामुळे पुढील दोन महिने तरी कांद्याचे भाव स्थिर राहतील. तसेच दिवाळीत नागरिकांना स्वस्त कांदा मिळू शकेल. राज्यात १२० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यासह सोलापूर जिल्ह्यासह नाशिक (Nashik), नगर, धुळे, जळगाव, पुणे (Pune) जिल्ह्यातील कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.त्यामुळे या जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची आवक घटली आहे.

मात्र, राज्यात मोठ्या प्रमाणात कांदा उपलब्ध असल्याने २० ते ३० रुपये किलोने कांद्याची किरकोळ बाजार विक्री होत आहे. राज्यात लाखो टन (Lakhs of tonnes)कांदा कांदा चाळीत पडून असून तो कांदा ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर अखेरपर्यंत पुरणार आहे. त्यामुळे जानेवारी महिन्यात कांद्याचे दर वाढणार असल्याचा अंदाज कांदा व्यापार्‍यांनी व्यक्त केला आहे. फेब्रुवारी महिन्यात रब्बी हंगामातील नवा कांदा बाजार उपलब्ध होणार आहे. त्या कांद्यास चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षाही कांदा व्यापार्‍यांनी व्यक्त केली आहे.


हे देखील वाचा –

पंतप्रधान मोदींच्या गुजरातचा शिक्षण दर्जा सर्वात वाईट

जोगेश्वरी मेट्रो स्थानकखालील खड्ड्यात तरुणाचा पाय अडकला

ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकचीपाच-सहा विमाने पाडली ! हवाई दल प्रमुखांचे वक्तव्य

Web Title:
संबंधित बातम्या