Home / महाराष्ट्र / गोगावलेंच्या घरी अघोरी पूजा! वसंत मोरेंचा आरोप

गोगावलेंच्या घरी अघोरी पूजा! वसंत मोरेंचा आरोप

पुणे –उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या राजकीय हस्तक्षेपामुळे शिवसेना फुटली. उद्धव ठाकरे हे रश्मी ठाकरे यांचे...

By: Team Navakal
bhart Gogavle
Social + WhatsApp CTA

पुणे –उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या राजकीय हस्तक्षेपामुळे शिवसेना फुटली. उद्धव ठाकरे हे रश्मी ठाकरे यांचे नेहमी ऐकतात असा आरोप शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री भरत गोगावले यांनी केला होता. त्यानंतर आता भरत गोगावले यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी घरात अघोरी पूजा केल्याचा दावा उबाठाचे नेते वसंत मोरे यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे तक्रार करण्याचाही इशारा दिला आहे.

वसंत मोरे म्हणाले की, भरत गोगावले यांनी रश्मी ठाकरे यांच्याबाबत केलेले आरोप अत्यंत चुकीचे आहेत. त्यांच्या अकलेचे दिवाळे निघाले आहे. माझा गोगावले यांना प्रश्न आहे की त्यांनी १७ ऑक्टोबर २०२४ रोजी बगलामुखी मंदिरातून पुजारी का बोलावले होते? त्यांनी त्या दिवशी कोणत्या कारणासाठी पूजा घातली होती? एवढेच नव्हे तर तब्बल ११ पुजारी बोलावून त्यांना काय उद्देश साध्य करायचा होता? महाराष्ट्रातील अनेक नेते अशा पूजांमध्ये सहभागी होतात. एका पूजेसाठी तब्बल १५ लाख रुपये खर्च होतो. जर गोगावले यांच्या घरी अशी पूजा झाली असेल, तर आम्ही नक्कीच अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे तक्रार दाखल करू.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या