Ahilyanagar News : बिबट्यांचे वाढते हल्ले आणि वाढते बळी गेल्या काही काळात या सगळ्यांचंच प्रमाण प्रचंड वाढलं आहे. याच पार्शवभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर पुण्यातील जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यांमध्ये बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे स्थानिक जिल्हा प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या शाळेच्या वेळेत महत्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत.
यात सकाळची वेळ: पहिली ते चौथीचे वर्ग सकाळी १० वाजता सुरू होणार आणि दुपारी ५: ३० वाजता सुटणार.
दुपारच्या वेळी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा सकाळी १०:३० वाजता सुरू होणार आहेत तर ०५:३० वाजता सुटणार.

बिबट्याचे हल्ले प्रामुख्याने पहाटे आणि संध्याकाळी होत असल्याने, परिसरातील शाळांच्या वेळेत तात्काळ बदल करण्यात आला आहे. सर्व मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या पालकांशी संपर्क साधून सुरक्षिततेच्या नियमांची माहिती द्यावी असे आदेश देखील देण्यात आले आहेत. हा बदल तातडीने लागू करण्यात आला असून, यामुळे विद्यार्थ्यांना घरी पोहोचण्यासाठी पुरेसा प्रकाश मिळेल हा देखील या मागचा मूळ हेतू आहे.

शालेय परिसरात असणाऱ्या शेतांची नियमित पाहणी करावी. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्या हल्ल्यांच्या ठिकाणी ट्रॅप पिंजरे त्वरित बसवावेत.
हे देखील वाचा – Kalyan News : ट्रेनमध्ये ‘हिंदी – मराठी’ वादावरुन तरुणाला बेदम मारहाण; तणावातून केली आत्महत्या









