मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर इंडियाचे विमान घसरले

Air India Flight Veers Off Runway At Mumbai Airport

मुंबई – कोचीहून मुंबईच्या दिशेने येणारे एअर इंडियाचे (Air India) विमान AI-2744 आज सकाळी ९:३० वाजताच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Chhatrapati Shivaji Maharaj International Airport) उतरताना धावपट्टीवरून घसरले. मुसळधार पावसामुळे लँडिंगदरम्यान विमानाने नियंत्रण गमावले आणि धावपट्टीवरून घसरल्याची प्राथमिक माहिती आहे. लँडिंगदरम्यान विमानाचे तीन टायर फुटल्याची पण माहिती आहे. त्याचप्रमाणे इंजिनलाही किरकोळ नुकसान झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र वैमानिकाच्या सतर्कतेमुळे विमान टर्मिनल गेटपर्यंत सुरक्षितरित्या पोहोचले. सर्व प्रवासी आणि क्रू सदस्य सुखरूप असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र धावपट्टी (Runway) क्रमांक ०९/२७ वर किरकोळ नुकसान झाले आहे.


या घटनेवर एअर इंडियाने अधिकृत निवेदन जारी करत म्हटले की, २१ जुलै रोजी कोचीहून मुंबईला येणारे AI-2744 हे विमान मुसळधार पावसात लँडिंग करताना धावपट्टीवरून घसरले. वैमानिकाच्या सतर्कतेमुळे विमान सुरक्षितपणे गेटपर्यंत आणण्यात आले. प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आले आहे.