Home / महाराष्ट्र / Ajit Pawar And Sharad Pawar : पुण्यात राजकारणाचा ब्लॉकबस्टर ड्रामा; आघाडी तुटली, दादांचा प्रस्ताव फेटाळला?

Ajit Pawar And Sharad Pawar : पुण्यात राजकारणाचा ब्लॉकबस्टर ड्रामा; आघाडी तुटली, दादांचा प्रस्ताव फेटाळला?

Ajit Pawar And Sharad Pawar : पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये एकत्रित जाणाऱ्या दोन्ही राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडीची चर्चा काल फिस्कटली असल्याचे समोर...

By: Team Navakal
Ajit Pawar And Sharad Pawar
Social + WhatsApp CTA

Ajit Pawar And Sharad Pawar : पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये एकत्रित जाणाऱ्या दोन्ही राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडीची चर्चा काल फिस्कटली असल्याचे समोर आले आहे.कारण अजित पवारांनी शरद पवारांच्या पक्षाला अवघ्या तीस ते पस्तीस जागा देऊ केल्यात आणि घड्याळ या चिन्हावर लढण्याची अट घातली, त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये राजकीय तिढा वाढला असल्याची माहिती सध्या समोर आली आहे.

त्यामुळे शरद पवारांच्या पक्षाचे अंकुश काकडे (Ankush Kakde) आणि विशाल तांबे (Vishal Tambe) हे काल रात्री झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीला हजर असल्याचे दिसून आले. त्यामुळे शरद पवारांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष पुन्हा महाविकास आघाडीत सहभागी होण्याचा प्रयत्न करतोय. मात्र अद्याप कोणताही ठाम निर्णय झालेला नाही, अशी माहिती देखील समोर आली आहे.

अशातच दोन्ही राष्ट्रवादीची पुणे महापालिकेत युती होणार नाही. आम्ही महाविकास आघाडीतून लढणार असल्याची महत्वपूर्ण माहिती अंकुश काकडे (Ankush Kakde) यांनी दिली आहे. घडाळ्याच्या चिन्हावर लढण्याचा अजित पवारांचा प्रस्ताव शरद पवारांना अमान्य असल्याचे समोर आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या दोन्ही राष्ट्रवादीचे जागावाटप आणि निवडणूक चिन्हावरून मतभेद झाल्याने काल रात्री चर्चा अपयशी ठरली. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने महाविकास आघाडीच्या साथीनेच लढण्याचा निर्णय घेत काँग्रेस आणि उद्धवसेनेशी चर्चा सुरू केल्याची माहिती आहे.

महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या दोन्ही पक्षांच्या आघाडीसाठी शरद पवार गटाचे नेते माजी महापौर अंकुश काकडे, माजी स्थायी समिती अध्यक्ष विशाल तांबे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बारामती होस्टेलवर काल रात्री भेट घेतली.

शरद पवार गट हा तुतारी चिन्हावर ठाम आहे. केवळ ३५ जागांवर लढण्याचा प्रस्तावही शरद पवार गटाला अमान्य होता. त्यामुळे चर्चा अपयशी ठरली, अशी माहिती समोर आली आहे.

राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाशी चर्चा अपयशी ठरल्यानंतर शरद पवार गटाने तातडीने महाविकास आघाडीच्या घटक पक्षांशी चर्चा सुरू केली असल्याची माहिती होती. काँग्रेस, उद्धवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या तिन्ही पक्षांची उशिरा रात्री उशिरा संयुक्त बैठक झाली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) चे विशाल तांबे, अंकुश काकडे, मनाली भिलारे, अश्विनी कदम आणि आमदार बापू पठारे, तर काँग्रेसकडून अरविंद शिंदे, अभय छाजेड, रमेश बागवे आणि ठाकरेंच्या शिवसेनेते वसंत मोरे, गजानन थरकुडे, संजय मोरे हि सगळी मंडळी उपस्थित होती.

हे देखील वाचा – India Extradition Fugitives : विजय मल्ल्या-ललित मोदीचे ‘पार्टी’ करत भारताला आव्हान; केंद्र सरकार ॲक्शन मोडमध्ये

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या