Home / महाराष्ट्र / Ajit Pawar : “2026 मध्ये मोठा नेता जगाचा निरोप घेणार!” ज्योतिषाची भविष्यवाणी खरी ठरल्याची सोशल मीडियावर चर्चा

Ajit Pawar : “2026 मध्ये मोठा नेता जगाचा निरोप घेणार!” ज्योतिषाची भविष्यवाणी खरी ठरल्याची सोशल मीडियावर चर्चा

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील भीषण निधनाने अवघा महाराष्ट्र सुन्न झाला आहे. संपूर्ण राज्य या धक्क्यातून...

By: Team Navakal
Ajit Pawar
Social + WhatsApp CTA

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील भीषण निधनाने अवघा महाराष्ट्र सुन्न झाला आहे. संपूर्ण राज्य या धक्क्यातून सावरत असतानाच, आता समाजमाध्यमांवर एका ज्योतिषीय भविष्यवाणीची तुफान चर्चा सुरू झाली आहे.

प्रसिद्ध ज्योतिषी अंकित त्यागी यांनी काही महिन्यांपूर्वी भारतीय राजकारणाबाबत केलेले एक भाकीत तंतोतंत खरे ठरल्याचा दावा अनेक नेटकऱ्यांकडून केला जात आहे.

नेमकी काय होती ती भविष्यवाणी?

ज्योतिषी अंकित त्यागी यांनी 5 डिसेंबर 2025 रोजी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले होते की, “2026 हे वर्ष भारताच्या राजकीय वर्तुळासाठी अत्यंत कठीण आणि क्लेशदायक असणार आहे. या वर्षात देशातील एका अत्यंत प्रभावशाली आणि मोठ्या राजनेत्याचा अकाली मृत्यू होण्याची दाट शक्यता आहे.”

अजित पवार हे केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे, तर देशाच्या राजकारणातील एक दिग्गज आणि वजनदार नेतृत्व होते. 28 जानेवारी 2026 रोजी झालेल्या त्यांच्या अपघाती निधनानंतर, अंकित त्यागी यांचा तो इशारा आता खरा ठरल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. नेटकरी ही जुनी पोस्ट मोठ्या प्रमाणात शेअर करत असून, हा केवळ योगायोग आहे की भविष्याचा संकेत, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

शरद पवारांचे अफवांकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन

एकीकडे या भविष्यवाणीची चर्चा सुरू असताना, दुसरीकडे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी जनतेला शांततेचे आवाहन केले आहे. ही घटना केवळ एक ‘दुर्दैवी अपघात’ असल्याचे सांगत त्यांनी कोणत्याही अफवा, तर्कवितर्क किंवा अशा प्रकारच्या भाकितांवर विश्वास न ठेवण्याचे सांगितले आहे.

अशा कठीण काळात संयम राखणे गरजेचे असून, सोशल मीडियावरील कोणत्याही असंवेदशील गोष्टींना प्रोत्साहन देऊ नका, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या