Home / महाराष्ट्र / Ajit pawar : घड्याळ चिन्हावरच लढा ! अजित पवार यांचा हट्ट

Ajit pawar : घड्याळ चिन्हावरच लढा ! अजित पवार यांचा हट्ट

Ajit pawar – घड्याळ चिन्हावरच लढा असा हट्ट अजित पवार (Ajit pawar) यांनी धरल्याने आज चर्चेला आलेल्या शरद पवार यांच्या...

By: Team Navakal
Ajit-Pawar
Social + WhatsApp CTA

Ajit pawar – घड्याळ चिन्हावरच लढा असा हट्ट अजित पवार (Ajit pawar) यांनी धरल्याने आज चर्चेला आलेल्या शरद पवार यांच्या शिष्टमंडळाला कोणताही प्रस्ताव न देता ‌‘नंतर कळवतो‌’ असे सांगून काढता पाय घ्यावा लागला.


अजित पवार यांच्याशी चर्चा करण्यासाठी आज दुपारी बारामती होस्टेल येथे शरद पवार गटाचे शिष्टमंडळ गेले होते. त्यामध्ये अंकुश काकडे, वंदना चव्हाण आणि  बापूसाहेब पठारे यांचा समावेश होता. नंतर वार्ताहरांशी बोलताना अंकुश काकडे यांनी सांगितले की, आम्ही चर्चा केली, पण कोणत्याही निष्कर्षापर्यंत  अजून पोहोचलेलो नाही. याहून जास्त काही आता सांगण्यासारखे नाही. अजित पवार एकटेच होते. ते इतर पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून सायंकाळी आम्हाला कळवणार आहेत. त्यानंतर सायंकाळी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून एकत्रित लढायचे असेल तर घड्याळ हेच निवडणूक चिन्ह असेल असा हट्ट धरण्यात आला.


शेवटी चर्चेतून काहीही फलनिष्पत्ती न होता अजित पवार यांचे म्हणणे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यासमोर ठेवून नंतर कळवण्यात येईल असे सांगण्यात आले. आता यावर शरद पवार यांच्या पक्षाकडून काय निर्णय घेतला जातो हे महत्त्वाचे असून, उद्या याबाबत चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

—————————————————————————————————————————————————–

हे देखील वाचा-

नवी मुंबई विमानतळाने घेतली पहिली व्यावसायिक उड्डाणाची झेप; भारतीय विमानवाहतूकीसाठी नवा अध्याय

महापालिकेच्या रणांगणात ठाकरे बंधू एकत्र; आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात संभाजीनगरमध्ये मशाल रॅली

ठाण्यात बिबट्याची दहशत! शहरी भागात वावर वाढल्याने नागरिक भयभीत

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या